“संदीप सिंह मोदींच्या बायोपिकचे निर्माते, फडणवीसांसह मंचावर” सचिन सावंत यांचे भाजपकडे बोट
संदीप सिंह हे 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' या बायोपिकचे निर्माते आहेत, ज्या सिनेमाचे पोस्टर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी यांनी लाँच केले होते." असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात राजकीय चिखलफेकही सुरु झाली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत संदीप सिंह यांची चौकशी आणि भाजप अँगल तपासण्याची मागणी केली. (Congress Spokesperson Sachin Sawant asks to check BJP angle in Sandeep Singh and Drugs Nexus in Sushant Case)
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती आहे, भाजप अँगल तपासून घ्यावा. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज नेक्ससमध्ये सीबीआय संदीप सिंह यांची चौकशी करणार आहे. संदीप सिंह हे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे निर्माते आहेत, ज्या सिनेमाचे पोस्टर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी यांनी लाँच केले होते.” असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.
.@OfficeofUT , @AnilDeshmukhNCP request you to see @BJP4India angle in following request. CBI to qn Mr. Sandeep Singh in drug nexus in #SushantSinghRajputDeathCase . He is a producer of a biopic ‘PM Narendra Modi’ whose poster was launched by Fadnavis ji.https://t.co/ZmqaXwWCGP https://t.co/Ne1lFxZKEu pic.twitter.com/7TyO3u2Trn
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 28, 2020
भाजप नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बॉलिवूडशी ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्याची विनंती केली होती. त्या ट्वीटला उत्तर देत सावंत यांनी संदीप सिंह यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.
सचिन सावंत यांनी विचारलेले प्रश्न
1. फडणवीस सरकार असताना चौकशीचा आदेश का नाही? 2. सीबीआय आणि ईडीला घाईघाईने आणण्याचे कारण संदीप सिंह होते का? 3. भाजपचे सर्वोच्च नेते बॉलिवूडच्या अगदी जवळून संपर्कात असल्याने त्यांची ड्रग्जच्या व्यवहाराला फूस होती का?
Question also need to be asked 1. Is this why no investigation ordered by fadnavis govt? 2. Was Sandeep Singh the reason CBI & ED hurriedly brought in? 3. As Topmost leaders of BJP are very close to bollywood, were not they privy to drug dealing?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 28, 2020
भाजप आमदार राम कदम यांनी इम्तियाज खात्री नामक व्यक्तीसोबतचा सुशांतचा जुना (2017) व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता बॉलिवूड ड्रग माफियाशी संबंधित ही व्यक्ती सुशांतशी गैरवर्तन करत असल्याचा दावा कदम यांनी केला. महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक मौन बाळगत आहे का? असा सवालही त्यांनी विचारला होता.
1/2 .. imtiaz Khatri has pictures with #SSR calling him a friend. Why did Khatri didn’t speak at all after SSR’s death. How is he related to the Bollywood-drug mafia nexus? Is Maharashtra Govt consciously silent? #SushantSinghRajput @OfficeofUT @AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra pic.twitter.com/ft5MYDVREQ
— Ram Kadam (@ramkadam) August 27, 2020
संबंधित बातम्या :
सुशांतकडून टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या खात्यात 10 कोटी, ईडीकडून कसून चौकशी
‘आम्ही एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता’, अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीचा दावा खोडला
(Congress Spokesperson Sachin Sawant asks to check BJP angle in Sandeep Singh and Drugs Nexus in Sushant Case)