मुंबई : इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत आहे. घरगुती गॅसच्या किमतीही वाढल्या आहेत. या इंधन दरवाढीवरुन विरोधकांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. पेट्रोलचे दर वाढत चालले आहेत. त्याकडे केंद्र सरकार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.(Sachin Sawant criticizes Prime Minister Narendra Modi over fuel price hike)
देशातील पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो तुम्ही पाहिला असेल. केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेची ती जाहिरात आहे. त्यावरुन आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. ‘प्रत्येक पेट्रोल पंपावर पंतप्रधान मोदींचा फोटो आहे. त्या फोटोमध्ये ते आधी हसायचे. मग मास्क घातला. आता वाटतं की त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधावी. कारण त्यांना ही लूट दिसत नाही’, अशा शब्दात सावंत यांनी इंधन दरवाढीवरुन मोदींना टोला लगावला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वावही वाढत आहे. आजही देशातल्या अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरात 30 ते 35 पैशांपेक्षा वाढलं आहे.
खरंतर, तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार आज सलग 11 व्या दिवशी ही वाढ झाली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. दिल्लीत 31 पैसे वाढीसह 90.19 वर पोचलं तर मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.62 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच मेट्रो शहरांमध्ये इंधनाच्या किंमती वाढल्याचं पाहायला मिळालं आहे.
प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर
नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.19 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Petrol Price Today): 96.62 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 91.41 रुपये प्रति लिटर
पुणे (Pune Petrol Price Today) : 96.25 रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Petrol Price Today): 92.25 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Petrol Price Today): 88.62 रुपये प्रति लिटर
प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव
नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.60 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 87.67 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.19 रुपये प्रति लिटर
पुणे (Pune Diesel Price Today) : 85.98 रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today): 85.31 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Diesel Price Today): 80.70 रुपये प्रति लिटर
संबंधित बातम्या :
Petrol Diesel Price Today : शंभरी गाठूनही पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे दर
परभणीत देशातील सर्वात महाग इंधन, पेट्रोल 98 रुपयांच्या पार, वाहनचालक त्रस्त
Sachin Sawant criticizes Prime Minister Narendra Modi over fuel price hike