कंगना भाजपची कठपुतली, महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा भाग : सचिन सावंत
ड्रग संदर्भातील कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच अभिनेत्री कंगना रनौत परत का गेली, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
मुंबई : बॉलिवूड आणि ड्रग माफियांची माहिती न देताच ‘ड्रामा क्वीन’ का परत गेली? असा सवाल विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर निशाणा साधला. गुन्ह्याची माहिती दडवणे हा सुद्धा गुन्हाच असल्याचे सांगत महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा अजेंडा उघड झाल्याचा दावाही त्यांनी केला. (Congress Spokesperson Sachin Sawant Slams Kangana Ranaut for returning Home without reveling Drugs Mafia names)
मुंबई आणि महाराष्ट्राला वाट्टेल ते बोलणारी ड्रामेबाज नटी मुंबईत येण्याआधी फारच फुशारक्या मारत होती. बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शन संदर्भात आपल्याकडे माहिती आहे, असेही ती तावातावाने सांगत होती. महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याची भाषा करत मुंबईत येऊन या नटीने तमाशाही केला. परंतु ड्रग संदर्भातील कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच परत का गेली, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
बॉलिवूडचे ड्रग माफीया कनेक्शन व त्यासंदर्भातील गुन्ह्यांची माहिती तिच्याकडे आहे, असे कंगनाने जाहीरपणे सांगितले होते. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबी याप्रकरणी चौकशी करत होती, त्यांच्याकडे कंगनाने ड्रग संदर्भातील माहिती देणे उचित होते. परंतु या नटीने कसलाही संदर्भ नसताना मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली. मुंबई पोलीस याचा त्यावेळी तपास करत नव्हते. कंगनाकडे बॉलिवूड व ड्रग कनेक्शनची जी माहिती आहे ती तिने एनसीबीकडे द्यावी, अशी आम्ही मागणीही केली होती. पण मुंबईत काही दिवस राहून कंगनाने ही माहिती दिली नाही, हे आश्चर्यकारक असल्याचे सावंत म्हणाले.
.@KanganaTeam has returned to HP. Really surprised! What abt her knowledge of drug mafia and bollywood connection? Wasn’t it her duty to give information she has to NCB? Isn’t it a crime to withhold information about a crime under IPC 202 & 176 also in ndps act? Or was it a hoax? https://t.co/a5JY4VBARo(Congress Spokesperson Sachin Sawant Slams Kangana Ranaut for returning Home without reveling Drugs Mafia names)
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 14, 2020
एखाद्या गुन्ह्याची माहिती दडवणे हे आयपीसीच्या कलम 176 आणि 220, एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा ठरते. नागरिक कर्तव्याचे ते हनन ठरते, याची कंगनाला माहिती असावी. तरीही ती माहिती न देता हिमाचल प्रदेशकडे परत गेली. यातून कंगना फक्त नौटकी करण्यात माहीर असून तेवढ्यासाठी मुंबईत येऊन तमाशा करुन परत गेली, असे म्हणण्यास वाव असल्याचेही सावंत म्हणाले.
कंगनाकडे ड्रग कनेक्शन संदर्भात असलेली माहिती ती देण्यास तयार आहे आणि ही माहिती दिली तर अनेकांचे पितळ उघडे पडेल, तसे होऊ नये या भीतीपोटीच कंगनाला वेगवेगळ्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचे महाराष्ट्रातील भाजप नेते म्हणत होते. महाराष्ट्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याबद्दल एकेरी भाषा तर तिने वापरलीच पण मुंबई पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंतही तिची मजल गेली. तिच्याकडे जर काही माहिती आहे तर मुंबईत काही दिवस राहून कंगनाने तिच्याकडील ड्रग माफियांची माहिती का दिली नाही. या सर्व प्रकरणातून कंगना ही भाजपची कठपुतली असून महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या कटाचा ती भाग आहे, हे आता स्पष्ट झाले, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला.
संबंधित बातम्या :
अभिनेत्री कंगना रनौत 10 दिवसांसाठी क्वारंटाईन
कंगना पाच दिवसानंतर मनालीला रवाना, पाच दिवसात काय-काय घडलं?
(Congress Spokesperson Sachin Sawant Slams Kangana Ranaut for returning Home without reveling Drugs Mafia names)