मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल होताच काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा

पणजी : काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने त्याबाबतचं पत्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दिलं. भाजपने संख्याबळ गमावल्याने सरकार स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली. विशेष म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केलाय. पर्रिकर कॅन्सरशी लढत आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार केले जात असून ते मुख्यमंत्री म्हणून […]

मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल होताच काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

पणजी : काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने त्याबाबतचं पत्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दिलं. भाजपने संख्याबळ गमावल्याने सरकार स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली. विशेष म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केलाय. पर्रिकर कॅन्सरशी लढत आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार केले जात असून ते मुख्यमंत्री म्हणून कामकाजही पाहत आहेत.

आमदार फ्रान्सिस डिसूझा यांच्या निधनाने भाजपकडे 13 आमदारांचं संख्याबळ उरलं आहे, मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वातील सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. अशावेळी जे सरकार अल्पमतात आहे, त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त करुन सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी द्यावी असं काँग्रेसने म्हटलं आहे.

गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा यांचं नुकतंच निधन झालं होतं. 64 वर्षीय डिसूझा कॅन्सरने त्रस्त होते. त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरु होते. ते आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपमध्ये गेले होते. त्यांनी 2002,2007,2012 आणि 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2012 मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते.

दरम्यान, 40 सदस्यीय गोवा विधानसभेसाठी 2017 मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेस  14 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला 13 जागी विजय मिळाला. मात्र अन्य पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीला 3, गोवा फॉर्वर्ड पक्षाला 3 आणि अपक्ष 3 या सर्वांनी मिळून भाजपला पाठिंबा दिल्याने इथे युतीचं सरकार बनलं.

यापूर्वीही काँग्रेसची मागणी

दरम्यान, काँग्रेसने सर्वात मोठा पक्ष ठरल्याने सत्तास्थापनेचा दावा सर्वात आधी केला होता. मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही. मग मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर गोवा,मुंबई आणि अमेरिकेत उपचार सुरु असल्याने, काँग्रेसने राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी विनंती केली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.