Nana Patole : देशाचे स्वातंत्र्य धोक्यात; भाजपाचा देश विकून कारभार, नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी (PM Modi) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. एकीकडे आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, मात्र दुसरीकडे देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

Nana Patole : देशाचे स्वातंत्र्य धोक्यात; भाजपाचा देश विकून कारभार, नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघात
नाना पटोलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 1:07 PM

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी (PM Modi) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. एकीकडे आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, मात्र दुसरीकडे देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा सुद्धा विरोधी पक्ष टिकला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. मात्र आता  विरोधी पक्ष संपवून हुकूमशाही राबवली जात आहे का असा प्रश्न जनतेला पडला आहे. सध्या देश विकून भाजप (BJP) कारभार करत  आहे. निरव मोदी, मेहुल चोक्शी यांचे कर्ज माफ होते, मात्र नंतर त्या कर्जाची वसुली सर्वसामान्यांच्या खिशातून होते. जनतेची लूट सुरू असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. याच विरोधात आता काँग्रेसने लढा उभारला असून, आम्ही दडपशाहीला घाबरणार नसल्याचेही पटोले म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हटलंय  पटोले यांनी?

नाना पटोले यांनी भजपा आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, मात्र दुसरीकडे देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. विरोधी पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरू आहे.  . इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा सुद्धा विरोधी पक्ष टिकला पाहिजे अशी भुमिका त्यांनी घेतली होती. मात्र सध्या हुकूमशाही सुरू आहे. भाजपाचे नेते खोटे स्वप्न दाखवून सत्तेवर आले मात्र आता देश विकून कारभार करत आहेत. निरव मोदी, मेहुल चोक्शी यांचे कर्ज माफ होते, मात्र त्यानंतर त्या कर्जाची वसुली ही सर्वसामान्यांच्या खिशातून सुरू आहे. देशात बेरोजगारी वाढली आहे, महागाई गगनाला भडली आहे. जीएसटीमुळे व्यापारी वर्ग परेशान आहे यासाठी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात हे आंदोलन सुरू असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

यंत्रणाचा गैरवापर

पुढे बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, हाती असलेल्या यंत्रणाचा गैरवापर करून भाजपाने महाविकास आघाडीचे सरकार पाडले. सध्या राज्यात जे सरकार सत्तेत आले आहे ते असंवैधानिक सरकार आहे.  याविरोधात आता कँग्रेस रस्त्यावर उतरले असून आम्ही जनसामान्यांचे प्रश्न मांडणार असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.