‘मोदी नटसम्राट! त्यांच्या लेखी अंबानी, अदानीच गरीब’, नाना पटोलेंचा शेलक्या शब्दात टोला

| Updated on: Feb 10, 2021 | 6:52 PM

मोदी हे नटसम्राट आहेत. राज्यसभेत भावूक झाल्याचं दाखवत होते. मात्र, अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावेळी ते भावूक झाले नव्हते, अशा शब्दात पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदी नटसम्राट! त्यांच्या लेखी अंबानी, अदानीच गरीब, नाना पटोलेंचा शेलक्या शब्दात टोला
नाना पटोले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

नागपूर : काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राजसभेतील भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन पटोले यांनी मोदींना जोरदार टोला हाणलाय. मोदी हे नटसम्राट आहेत. राज्यसभेत भावूक झाल्याचं दाखवत होते. मात्र, अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावेळी ते भावूक झाले नव्हते, अशा शब्दात पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.(Nana Patole mentions Prime Minister Narendra Modi as a Natsamrat)

‘मोदींच्या लेखी अदानी, अंबानी गरीब’

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि पहिल्यांदा लोकसभेत आले तेव्हा त्यांनी लोकसभेच्या पायऱ्यांवर माथा टेकला होता. आपण देशातील गरीब जनतेसाठी काम करणार असल्याचं त्यावेळी मोदींनी सांगितलं होतं. पण आता देशात अदानी आणि अंबानी हेच गरीब असल्याचं वाटत आहे, अशा टोलाही पटोले यांनी मोदींना लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांचे राज्यसभेतील अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत, ते देशातील जनतेला माहिती आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 77 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनात शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का? असा सवालही नाना पटोले यांनी केलाय.

‘मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा होईल’

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आणि सूट आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी आहे म्हणता तशी भाजपमध्येही आहे. पण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं की कुठलेही गट-तट नाहीत आणि त्यामुळेच महाविकास आघाडीला विजय मिळाला, असा दावाही पटोले यांनी केलाय. काँग्रेसचे मंत्री चांगलं काम करत आहेत. मी स्वत: मंत्र्यांचा आढावा घेईल, असं पटोले यांनी सांगितलं.

लाईट बिल थोडं कमी व्हावं ही अपेक्षा

सध्या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. सुरुवातीला वीज बिलात सवलत देण्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं. पण आता नागरिकांना पूर्ण वीज बिल भरावं लागेल, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. त्यावर बोलतातना वीज बिल थोडं तरी कमी व्हावं, अशी आमची अपेक्षा असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. त्यामुळे वाढीव वीज बिलात सवलत देण्याची मागणी काँग्रेस आपल्यास ऊर्जामंत्र्यांकडे करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

नितीन राऊतांचं ऊर्जा खातं नाना पटोलेंकडे जाणार? दोघेही एकाच वेळेस सोनियांच्या भेटीला

मोदी प्रचाराले आले पण हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार, नाना पटोलेंचा दिल्लीत निर्धार

Nana Patole mentions Prime Minister Narendra Modi as a Natsamrat