Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे; नाना पटोलेंकडून महाविकास आघाडीला आठवण!

काँग्रेसच्या आमदारांना निधी कमी दिला जात असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आठवण करुन दिली आहे.

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे; नाना पटोलेंकडून महाविकास आघाडीला आठवण!
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 3:22 PM

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वकाही आलबेल सुरु असल्याचं सांगितलं जातं. किमान समान कार्यक्रमावर सरकार योग्यरित्या काम करत असल्याचं बोललं जातं. पण गेल्या काही दिवसांत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यात आता काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश आहे. काँग्रेसच्या आमदारांना निधी कमी दिला जात असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आठवण करुन दिली आहे.(Congress state president Nana Patole’s displeasure over MLA funds)

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे. जिथे कमी तिथे बोललं तर काय चुकलं. समान वाटप व्हावं ही आमची मागणी आहे, असं नाना पटोले म्हणाले. यापूर्वी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही काँग्रेस आमदारांना मिळणाऱ्या निधीबाबत नाराजी व्यक्त केली होती.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरुन केंद्र सरकारवर टीका

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना केंद्रातील भाजप सरकार पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवून जनतेची लूट करत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात रस्ते विकासासाठी पेट्रोल-डिझेलवर 1 रुपया सेस लावून रस्ते चांगलं करण्याचं काम सुरु होतं. मनमोहन सिंग यांनीही हा सेस चालू ठेवला. पण मोदी सरकारने हा सेस 18 रुपये केला आहे. यात शेती विकासासाठी 4 रुपये सेस लावला आहे. शेतकऱ्यांसाठी हे सरकार काय काम करतंय? उलट शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.

देशातील सगळे टोल बंद करा- पटोले

जनतेची डबल लूट सुरु आहे. रस्त्यासाठी पेट्रोलवर सेस घेतला जातो आणि टोलही आकारला जातो. देशातील सगळे टोळ तात्काळ बंद करावे अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे. 2015 मध्ये राज्यातील फडणवीस यांच्या सरकारच्या काळात 25 टक्के पेट्रोल, तर डिझेलमध्ये 21 टक्के वाढ केली. त्यांचे सरकार जाईपर्यंत 11 रुपयांची वाढ केली. पण महाविकास आघाडी सरकारने फक्त 1 रुपयाची वाढ केल्याचा दावा पटोले यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

मुंबईत महागाईचा भडका, पेट्रोलची वाटचाल शतकाकडे; वाचा आजचे दर

धनंजय मुंडेंनी काय देऊन प्रकरण सेटलं केलं, हे त्यांनाच ठाऊक: निलेश राणे

Congress state president Nana Patole’s displeasure over MLA funds

'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.