Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress Upset | निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेस नाराज, स्वतंत्र बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही.निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. (Congress Upset in Maha Vikas aaghadi)

Congress Upset | निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेस नाराज, स्वतंत्र बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 2:59 PM

मुंबई : महाविकास आघाडीतील तीन पक्षांमधील कुरबुऱ्या सुरुच असल्याचं चित्र आहे. निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतलं जात नसल्याने काँग्रेस नाराज आहे. काँग्रेसने आज बैठक घेऊन त्याबाबत चर्चा केली. मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे कोरोनावर मात करुन आलेले अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच या बैठकीला हजेरी लावली. (Congress Upset in Maha Vikas aaghadi)

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही. निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे.

या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना या बैठकीबाबतची माहिती दिली. थोरात म्हणाले “राज्याचे काही प्रश्न घेऊन आम्ही एकत्र बसलो होतो. चक्रीवादळ झालं, त्या पाहणीसाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. आम्ही ते मांडणार आहोत. आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्या काही मागण्या आहेत. साहजिकच काही प्रश्न आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सामील करणयाचा प्रश्न आहे, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत”

महाविकास आघाडीचेही काही प्रश्न आहेत, त्यावर चर्चा झाली. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असं थोरात यांनी सांगितलं. (Congress Upset in Maha Vikas aaghadi)

महाविकास आघाडीतील काँग्रेस हा घटकपक्ष आहे. आम्ही 12 मंत्री आहोत. राज्याचे काही विषय घेऊन चर्चा झाली. कोरोना संकट, वादळ आहे. पालकमंत्री, संपर्कमंत्री यांची चर्चा झाली. सरकार म्हणून आमची चर्चा झाली, असं थोरात म्हणाले.

आम्ही ज्यावेळी एकत्र बसतो, त्यावेळी आमच्या चर्चा होतात. आमच्या अपेक्षा साहजिकच सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांकडून आहेत. त्याबाबतही चर्चा झाली. आम्ही घटकपक्ष आहोत. सरकार तीन पक्षांचं आहे. एकट्या पक्षाच्याही चर्चा होतात. आमच्या मागण्या आहेत त्या महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत, आमच्या वैयक्तिक मागण्या नाहीत, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

सोनियांच्या आग्रहानंतर माजी पंतप्रधान पुन्हा रिंगणात, 87 व्या वर्षी राज्यसभा उमेदवारी

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.