विखेंसह पाच आमदारांवर कारवाईसाठी काँग्रेस निकालाची वाट पाहणार
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला यशाची अपेक्षा आहे. पण असं असताना काँग्रेसला मदत न करणाऱ्या स्वपक्षीयांवर मात्र काँग्रेसने आस्ते कदम घेतल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास पाच नेत्यांवर काँग्रेसवर कारवाईसाठी हळूहळू पावलं उचलायचा पवित्रा घेतलाय. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करुनही काँग्रेसने कारवाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही. काँग्रेसच्या पाच नेत्यांनी पक्षाविरोधात लोकसभा निवडणुकीत काम केलं. त्यात राधाकृष्ण विखे […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला यशाची अपेक्षा आहे. पण असं असताना काँग्रेसला मदत न करणाऱ्या स्वपक्षीयांवर मात्र काँग्रेसने आस्ते कदम घेतल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास पाच नेत्यांवर काँग्रेसवर कारवाईसाठी हळूहळू पावलं उचलायचा पवित्रा घेतलाय. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करुनही काँग्रेसने कारवाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही.
काँग्रेसच्या पाच नेत्यांनी पक्षाविरोधात लोकसभा निवडणुकीत काम केलं. त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर चार आमदारांचा समावेश आहे. पण त्यांच्यावर कारवाई करताना काँग्रेसने आस्ते कदमची भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यापेक्षा लोकसभा निकालापर्यंत प्रतीक्षा करायच्या तयारीत काँग्रेस आहे. काही ठिकाणी काँग्रेस आमदारांनी स्वतःच्या पक्षाचंच काम केलं नाही, तर काही ठिकाणी आघाडीधर्म पाळलेला नाही. सर्वात मोठा प्रश्न काँग्रेससमोर विखे यांचा आहे. कारण विखे यांचं बडं प्रस्थ आहे. त्यात ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आगामी काळात त्यांचा पक्षाला उपयोग होऊ शकतो. म्हणून लगेच कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे.
काँग्रेसच्या विखेंसह नितेश राणे यांनी त्यांचे भाऊ निलेश राणे यांचा प्रचार केला. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनी उघडपणे शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार केला. तर आमजाक जयकुमार गोरे यांनी आघाडीधर्म सोडून भाजपची मदत केली. तरीही काँग्रेसची सावध भूमिका पुढच्या समीकरणांचा भाग असल्याचं मानलं जातंय.
भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणायचा काँग्रेसचा प्रयत्न होता. पण त्याशिवाय काँग्रेसच्या अंतर्गत कलहाने पक्ष हैराण झाला. पक्षातले नेत्यांची कुरकुर तिकीट वाटपातही पाहायला मिळाली. पण तरीसुद्धा निकालाच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची गरज काँग्रेसला लागू शकते. त्याचमुळे काँग्रेस आता ताकही फुंकून पिताना दिसत आहे.
संबंधित बातम्या :