CWC Meeting | भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप, राहुल गांधींवर भडकलेले कपिल सिब्बल पुन्हा शांत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप लावले.
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत 23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर (Kapil Sibal Angry On Rahul Gandhi) आज पक्षाच्या कार्यकारीणीची बैठक पार पडली. काँग्रेसच्या कार्यकारीणीच्या बैठकीत चंगलंच घमासान झालं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप लावले. त्यावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद राहुल गांधीवर नाराज झाले. बैठकीदरम्यान ट्विट करत कपिल सिब्बल यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली (Kapil Sibal Angry On Rahul Gandhi) होती. मात्र, त्यानंतर त्यांनी हे ट्विट मागे घेतलं.
“राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली’, मी राजस्थान उच्च न्यायालयात काँग्रेसचा योग्य पक्ष मांडला. मणिपूरमध्ये भाजपला खाली खेचलं, पक्षाला वाचवलं. गेल्या 30 वर्षात भाजपच्या बाजूने एकही असं वक्तव्य केलं नाही, ज्यामुळे भाजपला फायदा होईल. तरीही आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली, असं म्हटलं जात आहे”, असं ट्विट करत कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींवरील नाराजी व्यक्त केली होती.
Rahul Gandhi says “ we are colluding with BJP “
Succeeded in Rajasthan High Court defending the Congress Party
Defending party in Manipur to bring down BJP Govt.
Last 30 years have never made a statement in favour of BJP on any issue
Yet “ we are colluding with the BJP “!
— Kapil Sibal (@KapilSibal) August 24, 2020
Kapil Sibal Angry On Rahul Gandhi
या ट्विटनंतर कपिल सिब्बल यांनी आणखी एक ट्विट केलं. राहुल गांधींनी स्वत: सांगितलं की त्यांनी अशा शब्दांचा वापर केला नाही. त्यामुळे मी माझं आधीचं ट्विट काढतो आहे.
त्याशिवाय, बैठकीला उपस्थित गुलाम नबी आझाद म्हणाले, “जर कुठल्याही प्रकारे माझा भाजपशी संबंध सिद्ध झाला, तर मी राजीनामा देऊन काँग्रेसच्या सर्व पदांचा त्याग करेन. पत्र लिहिण्याचं कारण काँग्रेसची कार्यकारिणी होती”.
कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद हे त्या 23 नेत्यांपैकी आहेत, ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र लिहिलं होतं. या पत्रात काँग्रेसच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सध्या पक्षाला अशा नेतृत्त्वाची गरज आहे जो पूर्णवेळ पक्षाला देऊ शकेल, अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती.
काँग्रेस कार्यकारीणीच्या सोमवारी (24 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत या पत्रावरुन घमासान पाहायला मिळालं. सोनिया गांधीनी देखील याच पत्राचा संदर्भ देत त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला. तसेच, राहुल गांधींनी देखील या पत्रावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले. “हे पत्र आताच का लिहिलं गेलं? जेव्हा आपण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लढत आहोत आणि सोनिया गांधींची प्रकृती ठीक नाही, अशा वेळीच हे पत्र का लिहिल्या गेलं”, असा सवाल राहुल गांधींनी या बैठकीत उपस्थित केला.
राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्ष होण्याचं जवळपास निश्चित, CWC बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची चिन्हंhttps://t.co/NPqdwTpTx3 #RahulGandhi #CongressPresident
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 24, 2020
Kapil Sibal Angry On Rahul Gandhi
संबंधित बातम्या :
…त्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं : बाळासाहेब थोरात