Maharashtra : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या होणार घटनापीठाची स्थापना, सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया
सत्तासंर्घषाच्या सुनावणीसाठी शिंदे गटाने मंगळवारीच रिट पीटीशन हे सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला असून बुधवारी सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षात नेमके काय होणार याची उत्सुकता ही राज्याला लागली आहे. सरन्यायाधीश लळीत यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील (Power struggle) सत्तासंघर्षावरील सुनावणी ही लांबणीवर पडलेली आहे. त्याअनुशंगाने महत्वाचा निर्णय झाला आहे. सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी बुधवारी (Constitution Bench) घटनापीठाची स्थापना होणार आहे. (Eknath Shinde) शिंदे गटाच्या रिट पिटीशननंतर लागलीच हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.निवडणूक आयोगावरील सुनावणीची स्थगिती उठवण्याच्या संदर्भात शिंदे गटाने मागणी केली होती. त्यानंतर आता घडामोडी वेगाने घडत असून बुधवारी याप्रकरणी घटनापीठ गठीत करण्याचे आदेश सरन्यायाधीश उदय लळीत यांनी दिले आहेत.
शिंदे गटाच्या रिट पीटीशननंतर हालचाली