‘मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’, काँग्रेसचं मुंबईत आंदोलन, भाई जगतापांची घोषणा

मुंबई काँग्रेसनं भाजपविरोधात मंगळवारी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या आंदोलनाची घोषणा केलीय.

'मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?',  काँग्रेसचं मुंबईत आंदोलन, भाई जगतापांची घोषणा
भाई जगताप, मुंबई काँग्रेस अध्यक्ष
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 3:22 PM

मुंबई : ‘मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’ या कॅम्पेनवरुन देशाच्या राजकारणात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी जोरदार लढाई सुरु आहे. अशावेळी आता मुंबई काँग्रेसनं भाजपविरोधात मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिलाय. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या आंदोलनाची घोषणा केलीय. त्यावेळी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली? याचा जाब भाजपला विचारणार असल्याचं भाई जगताप यांनी म्हटलंय. भाजपला सत्याचा सामना करावाच लागेल. उत्तर मुंबईतून या आंदोलनाची सुरुवात होईल, असं जगताप यांनी आज जाहीर केलंय. (Congress protests against BJP in Mumbai over corona vaccination policy)

‘कोरोना लसीकरणाबाबत देशात दयनीय स्थिती आहे. 18 ते 44 वयोगातील लोकांचं लसीकरण करायला हवं ते झालं नाही. पंतप्रधान म्हणतात की राज्याची जबाबदारी आहे. लसीचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार रेशनिंग करत आहे. जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी देशात लसीकरण करुन घेतलं. मात्र, भारतात पंतप्रधान कोरोना नष्ट झाला असं सांगत 93 देशांना लस विकतात. भाजप नेते याचं समर्थन करतात. देशाशी कोणतीही ट्रिटी नाही. मी देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करतो’, अशा शब्दात भाई जगताप यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय.

लसीकरण केंद्रांबाहेर 100 कार्यकर्ते आंदोलन करणार

काँग्रेसकडून मुंबईत उद्या आंदोलन केलं जाणार आहे. उत्तर मुंबईतून या आंदोलनाला सुरुवात होईल. मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रात लसीकरण केंद्राबाहेर 100 कार्यकर्ते आंदोलन करतील. त्यावेळी मास्क घालून मानवी साखळी तयार केली जाईल. पुढील 6 दिवस विरोध सुरु राहणार असल्याचं जगताप यांनी जाहीर केलंय. मोदीजी, आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली? असा प्रश्न या आंदोलनातून विचारला जाणार आहे. भाजपला सत्याचा सामना करावाच लागेल, असं आव्हान भाई जगताप यांनी भाजप नेत्यांना दिलंय.

केंद्राकडून राज्याला सापत्न वागणूक

त्याचबरोबर काळ्या बुरशी अर्थात ब्लॅक फंगसवरील उपचारांसाठी लागणारे इंजेक्शन महाग आहे. एका इंजेक्शनसाठी 1 हजार 500 ते 8 हजार 500 रुपये लागतात. सर्वसामान्यांना हे परवडणारं नाही. केंद्रानं राज्य सरकारला हे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी मनाई केली आहे. केंद्राने परवानगीची अट टाकली आहे. मुंबईला रोज 2 हजार इंजेक्शनची गरज आहे. एका पॅकेटमध्ये 7 गोळ्या असलेलं पॅकेट तब्बल 20 हजार रुपयांना आहे. हे सर्वसामान्यांना परवडणारं नाही. अशावेळी केंद्र सरकारकडून राज्याची कोंडी केली जात आहे. राज्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप जगताप यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा, 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण फुकट मिळवा; भातखळकरांचं ट्विट

राज्यसरकार नुकसानग्रस्तांना मदत करेलच, पण फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं : रोहित पवार

Congress protests against BJP in Mumbai over corona vaccination policy

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.