गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांमध्ये ‘वंचित’ची आघाडी, एकावर हत्येचा गुन्हा सिद्ध
मुंबई : महाराष्ट्रात येत्या 29 तारखेला चौथ्या टप्प्यातील मतदान होतंय. या टप्प्यात एकूण 323 उमेदवार मैदानात आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी 17 मतदारसंघातून एकूण 323 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 320 उमेदवारांच्या वैयक्तिक माहितीसह त्यांची आर्थिक मालमत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीसह विश्लेषण करण्यात आलंय. उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हे विश्लेषण करण्यात आलंय. राज्यात चौथ्या […]
मुंबई : महाराष्ट्रात येत्या 29 तारखेला चौथ्या टप्प्यातील मतदान होतंय. या टप्प्यात एकूण 323 उमेदवार मैदानात आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी 17 मतदारसंघातून एकूण 323 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 320 उमेदवारांच्या वैयक्तिक माहितीसह त्यांची आर्थिक मालमत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीसह विश्लेषण करण्यात आलंय. उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हे विश्लेषण करण्यात आलंय.
राज्यात चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या एकूण 320 पैकी 89 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, तर 64 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील दोन उमेदवारांनी त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. नाशिकमधले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन चंद्रकांत पवार यांच्यावर हत्येचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असून तो सिद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन उमेदवारांवर हत्येचा प्रयत्न करण्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
चोरी आणि दरोडा अशा प्रकरणात गुन्हे दाखल असलेले एकूण सहा उमेदवार आहेत. तर भडकाऊ भाषणे करणारे एकूण 4 उमेदवार आहेत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. 10 उमेदवारांनी महिलांवर अत्याचार केल्याप्रकारणी गुन्हे दाखल असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. अपहरणाचा गुन्हा दाखल असणारे एकूण दोन उमेदवार आहेत. राजकीय पक्षांना निवडून येणारा उमेदवार हवा असतो.
गुन्हे दाखल असलेले पक्षनिहाय उमेदवार
वंचित बहुजन आघाडी – 7 उमेदवारांवर गुन्हे
बहुजन समाज पक्ष – 4 उमेदवारांवर गुन्हे
शिवसेना – 4 उमेदवारांवर गुन्हे
राष्ट्रवादी काँग्रेस – 5 उमेदवारांवर गुन्हे
काँग्रेस – 4 उमेदवारांवर गुन्हे
भाजप – 4 उमेदवारांवर गुन्हे
गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणारे उमेदवार
वंचित बहुजन आघाडी – 5 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
बहुजन समाज पक्ष – 4 उमेदवार
शिवसेना – 4 उमेदवार
राष्ट्रवादी – 2 उमेदवार
काँग्रेस – 1 उमेदवार
भाजप – 3 उमेदवार
चर्चेत असणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार
समीर भुजबळ ( राष्ट्रवादी काँग्रेस ) – एकूण 16 गुन्हे नोंद
शिवाजी आढळराव पाटील (शिवसेना) – एकूण 10 गुन्हे
राजन विचारे (शिवसेना) – एकूण 9 गुन्हे
गोपाळ शेट्टी (भाजप) – एकूण 9 गुन्हे
मनोज कोटक (भाजप) – 2 गुन्हे नोंद
संजय निरुपम ( काँग्रेस ) – एकूण 11 गुन्हे नोंद
जनतेकडून निवडून दिला जाणारा उमेदवार देशाच्या संसदेत जाऊन प्रतिनिधित्व करणार आहे. जनतेच्या हिताचे कायदे बनवण्याची जबाबदारी या खासदारांवर असेल. पण ज्यांच्यावर हत्येसारखे गुन्हे दाखल आहेत, ते उमेदवार जनतेसाठी कोणते कायदे बनवणार असाही प्रश्न उपस्थित होतो. विविध आंदोलनांसाठी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे अनेक राजकीय नेत्यांवर असतात. पण हत्या, अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे असणारेही उमेदवार या निवडणुकीत आहेत.