Video Special Report | दसरा मेळाव्यानंतरचा हा सिनेमा हिट आहे, तुम्ही पाहिलाय का?
दोन्ही मेळावे संपल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाद्बिक युद्धाचा नवा सिनेमा सुरु झाला आहे. आपल्या नेत्याच्या भाषणाचा दाखला दोन्ही गटाचे नेते एकमेंकावर जहरी टीका करत आहेत.
मुंबई : दसऱ्याला शिवसेना आणि शिंदे गट दोघांचे मेळावे झाले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये रंगलेला आरोप प्रत्यारोपाचा सामना महाराष्ट्रानं पाहिला. मात्र, दोन्ही मेळावे संपल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाद्बिक युद्धाचा नवा सिनेमा सुरु झाला आहे. आपल्या नेत्याच्या भाषणाचा दाखला दोन्ही गटाचे नेते एकमेंकावर जहरी टीका करत आहेत. दसरा मेळाव्यानंतरचा हा नवा राजकीय सिनेमा हिट ठरत आहे.
दसरा मेळाव्यातील जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांवर टीकास्त्र सोडले. ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसोबतच, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या दिवशी त्याचा चांगलाच समचार घेतला. गर्दीवरुन शिंदेंनी शिवसेना कोणाची हे स्पष्ट केलं, असं सांगताना ठाकरेंचं भाषण म्हणजे शिमगा असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
2019 मध्ये मंत्रिपदाची शपथ घेताना, शिंदेंना काँग्रेस दिसली नव्हती का ? असा सवाल ठाकरेंनी शिंदेंना केला. त्यावरुन फडणवीसांनी उत्तर दिले. काँग्रेससोबत गेले म्हणूनच शिवसेना फुटल्याचेही फडणवीस म्हणाले.
दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट दोघांनीही सर्व शक्ती पणाला लावली होती. शिवाजी पार्कातल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पोलिसांच्या अंदाजाप्रमाणं जवळपास 1 लाख गर्दी होती. तर, बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या मेळाव्यात जवळपास 2 लाखांची गर्दी जमली होती.
मात्र शिंदेंचं भाषण सुरु असताना, लोकं उठून जात असतानाचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. यावरुन शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि विरोधी पक्ष नेते अजित पवारांनीही जबरदस्त टोलेबाजी केली आहे.
शिवतीर्थावरच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर तुटून पडले. मात्र, नवनीत राणांनी यावरुन विखारी टीका केलीय. उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडल्याचं नवनीत राणा म्हणाल्या.