संभ्रमित युग! बदनाम कमळ!; सामनाच्या अग्रलेखातून भाजपचे वाभाडे; भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’वर बॉम्ब

बिहारात सत्तापरिवर्तन होताच राष्ट्रीय जनता दलावर सीबीआय, ईडीच्या धाडी टाकण्यात आल्या. यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार म्हणजे भाजपकडून करण्यात आले मात्र तेजस्वी यादव यांनी थेट पणे ‘‘महाराष्ट्रात जे घडले ते बिहारात होणार नाही. बिहार घाबरणार नाही. जे डरपोक आहेत त्यांना ईडी-सीबीआयची भीती दाखवा.’’ असं जाहीर आव्हानच त्यांनी भाजपला दिलं आहे.

संभ्रमित युग! बदनाम कमळ!; सामनाच्या अग्रलेखातून भाजपचे वाभाडे; भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’वर बॉम्ब
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 7:03 AM

मुंबईः शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून (Samana) आज भाजपचे वाभाडे काढण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन देशातील स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आणणाऱ्या भाजप सरकारचे ईडी आणि सीबीआयच्या छापेमारीप्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजप सरकारमुळे देशातील स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात आली असल्याने जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल असा इशाराही सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. भाजपच्या (BJP) राजकीय हस्तक्षेपामुळे देशात एक संभ्रमित युग अवतरले असल्याचेही या अग्रलेखात म्हटले आहे. ज्या भाजपने देशात अनेक ठिकाणी ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अनेक राज्यातील राजकीय परिस्थिती ढळमळीत करणाऱ्या भाजपच्या ऑपरेशन लोटस म्हणून जे चालवले जाते त्यामुळे विष्णूचे आवडते फूल बदनाम झाले असल्याची टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

देशाची परिस्थिती संभ्रमित

सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधताना देशातील राजकीय परिस्थिती ढळमळीत करणाऱ्या केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ईडी आणि सीबीआयच्या छापेमारीमुळे महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यातील सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, या अशा घटनांमुळे देशाची परिस्थिती संभ्रमित झाली असल्याचे सामनातून म्हटले आहे.

विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम

भारतात ज्या ज्या राज्यात भाजपविरोधात सरकार स्थापन झाली आहेत. त्या त्या राज्यातील सरकारला ईडी, सीबीआयचा धाक दाखवून आमदार फोडणे, सरकार पाडणे अशी कूटनिती ज्या भाजपकडून चालू आहे, त्यालाच ऑपरेशन लोटस म्हटले गेले आहे. मात्र राजकारणासाठी ज्या ऑपरेशन लोटस म्हणून जे चालवले जाते त्यामुळे विष्णूचे आवडेत फूल कमळ बदनाम झाले असल्याचे सामनातून म्हटले आहे. यामध्ये त्यांनी केंद्रासह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

ऑपरेशन कमळ ‘फेल’

भाजपकडून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, बिहारमध्येही राजकीय परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला मात्र महाराष्ट्राप्रमाणे ऑपरेशन कमळ या राज्यात फेल गेले असल्याचेही सामनातून म्हटले आहे.

शिंदे गट गुडघ्यावर गेला

सत्ता मिळवण्यासाठी केंद्र सरकार देशातील विविध सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. त्यामुळे अनेक राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. ज्याप्रमाणे दिल्ली, बिहार, तेलंगणा या राज्यातून ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवला गेला असला तरी या राज्यातील राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेले बंडखोर आमदारांनी हार मानून ते गुडघे टेकले नाहीत, त्यांनी हार मानली नाहीत असंही म्हटले आहे. त्यामुळे भाजपवर निशाणा साधताना त्यांनी शिंदे गटालाही लक्ष्य केले आहे.

भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’वर बॉम्ब टाकला

तेलंगणा, बिहार, दिल्लीतील सरकार पाडण्याचा विचार भाजपकडून केला जात असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपल्यावर कारवाई होऊनही हार मानली नाही. दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले गेले असले तरी त्यांनी आपण महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, आपण अशी हार मानणार नाही म्हणत मद्यधोरणाबाबत टीकेचे धनी असलेल्या मनीष सिसोदियांनी भाजपवरच पलटवार करत भाजपच्या वॉशिंग मशीनवर बॉम्ब टाकला आहे.

महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली

सामना अग्रलेखातू भाजवर टीका करताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केला गेला आहे. ईडी, सीबीआयला घाबरून शिंदे गट भाजपला जाऊन मिळाला असल्याने महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली म्हणत शिंदे गटाला लक्ष्य करण्यात आले आहे.

राऊत हे बेडरपणे ईडीला सामोरे गेले

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ प्रकरणी कारवाई करण्यात आली मात्र त्यांनीही हार न मानता कारवाईला सामोरे गेले. आता संजय राऊत ईडीच्या कोठडीत असले तरीही त्यांनी भाजपवर निशाणा साधत कारवाईला सामोरे गेले आहेत. त्यांच्या या कृतीचे समर्थन करत राऊत हे बेडरपणे ईडीला सामोरे गेले असल्याचे म्हणत त्यांचे समर्थन केले आहे.

महाराष्ट्रासारखा बिहार घाबरणार नाही.

बिहारात सत्तापरिवर्तन होताच राष्ट्रीय जनता दलावर सीबीआय, ईडीच्या धाडी टाकण्यात आल्या. यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार म्हणजे भाजपकडून करण्यात आले मात्र तेजस्वी यादव यांनी थेट पणे ‘‘महाराष्ट्रात जे घडले ते बिहारात होणार नाही. बिहार घाबरणार नाही. जे डरपोक आहेत त्यांना ईडी-सीबीआयची भीती दाखवा.’’ असं जाहीर आव्हानच त्यांनी भाजपला दिलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.