पुढं गाडी मागं गाडी, मध्ये बसला गुलाबराव गडी!
गली गली ढूंढनेवाली पोलीस आज हमारे साथ है... असं देखील गुलाबराव यावेळी म्हणाले.
औरंगाबाद : सिल्लोड येथील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी आपल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या कलमांची यादीच वाचून दाखवली. गली गली ढूंढनेवाली पोलीस आज हमारे साथ है… असं देखील गुलाबराव यावेळी म्हणाले.
पूर्वी दुर्गादेवी आली, गणपती आले. तसेच शिवजयंतीच्या वेळीही पोलिसांचा सासेमिरा मागे लागायचा. पण आता पुढ गाडी माग गाडी, मध्ये बसला गुलाबराव गडी! असं म्हणत गुलाबरावांनी स्वत:चेच कौतुक केले.
म्हणतात ना उकीरड्याचे पण दिवस येतात. गली गली ढूंढनेवाली पोलीस आज हमारे साथ है असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले.
मी पानटपरी चालवणारा माणूस आहे मी तरी देखील माझ्यावर टीका झाली. आमच्यावर तुम्ही टीका नाही करु शकत. आयुष्याची 35 वर्ष आम्ही घालवली आहेत असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.