‘पाकिस्तान अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे अमेरिकेचे पित्त खवळले असेल ?’, ‘सामना’तून इम्रान खानवरती टीका
पाकिस्तान आणि चीन हे आपले शेजारी देश आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवरती आपल्याला लक्ष ठेवावे लागते. आपली इच्छा असो किंवा नसो आपल्याला दोन्ही देशांच्या प्रत्येक घटनेवरती बारकाईने लक्ष ठेवावे लागते. इम्रान खान यांच्या सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावामुळे पाकिस्तानात राजकीय दंगल सुरू आहे.
मुंबई – “कालपर्यंत अमेरिकेच्या (America) खैरातीवरती जगणारा आणि ऊठ म्हटले की उठणारा पाकिस्तान (Pakistan) अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या (Russia) मांडीवर जाऊन बसल्यामुळे अमेरिकेचे पित्त खवळले असेल आणि अमेरिकेने इम्रान यांच्या खुर्चीखाली फटाका लावला असा आरोप केला जात असेल तर अमेरिकेचा पूर्वेतिहास पाहता वावगा म्हणता येणार नाही” अशी टीका आजच्या सामनामधून (Samana) इम्रान खानवरती (Imran Khan) केली आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानची संसद बरखास्त करून टाकली
पाकिस्तान आणि चीन हे आपले शेजारी देश आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवरती आपल्याला लक्ष ठेवावे लागते. आपली इच्छा असो किंवा नसो आपल्याला दोन्ही देशांच्या प्रत्येक घटनेवरती बारकाईने लक्ष ठेवावे लागते. इम्रान खान यांच्या सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावामुळे पाकिस्तानात राजकीय दंगल सुरू आहे. यावर तोडगा म्हणून पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानची संसद बरखास्त करून टाकली आहे. सभागृहात शक्तीपरीक्षेला सामोरे न जाता थेट संसद विसर्जित करून तीन महिन्यात निवडणुका घेण्याची घोषणा केली असल्याचे सामनात म्हटले आहे.
राजकीय दंगलीचा वणवा पाकिस्तानच्या सर्वोच्छ न्यायालयात भडकताना दिसेल
काही दिवस राजकीय दंगलीचा वणवा पाकिस्तानच्या सर्वोच्छ न्यायालयात भडकताना दिसेल. संसद विसर्जित करताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भेट अमेरिकेवरती दोषारोप केला आहे. विरोधी पक्षांचे नेते आणि सरकारमधील काही लोकांना हाताशी धरून अमेरिकेने पाकिस्तानातली सत्ता उलथवून टाकल्याचा गंभीर आरोप इम्रान खान यांनी केला आहे. या वादात आता रशियाने उडी घेतल्याने दाव्याची पुष्टी केली आहे. इम्रान खान यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा आरोप झुगारून दोन महिन्यापूर्वी रशियाच्या पंतप्रधानांची भेट घेतली. त्याची किमत आता इम्रान खान यांना भोगावी लागत असल्याचा आरोप रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे.
रशियात पुतीन यांची भेट घेतल्यानंतर युद्धाला सुरूवात झाली
इम्रान खान यांनी रशियात जाऊन पुतीन यांची भेट घेतल्यानंतर यु्द्धाला सुरूवात झाली. या कारणामुळे अमेरिकेने त्यांच्यावरती ही वेळ आणली असं म्हटलं जात आहे. पाकिस्तान अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे अमेरिकेचे पित्त खवळले असेल म्हणून त्यांनी इम्रान खान यांच्या खुर्चीखाली फटाका लावला असावा अशी टीका करण्यात सामनातून करण्यात आली आहे.