Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावर नाना पटोलेंची टीका, मदतीनिधीवरुन केंद्र सरकारवरही हल्लाबोल

फडणवीस आमच्या सायकल रॅलीला नौटंकी म्हणाले होते. आता त्यांचाही हा पूरग्रस्त भागाचा दौरा नौटंकी आहे का? असा सवाल पटोले यांनी केलाय. त्याचबरोबर 4 दिवसांनी आपण पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

देवेंद्र फडणवीसांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावर नाना पटोलेंची टीका, मदतीनिधीवरुन केंद्र सरकारवरही हल्लाबोल
नाना पटोले यांची देवेंद्र फडणवीस यांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर टीका
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 7:03 PM

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर दौरे करत आहेत. मात्र, फडणवीसांच्या पाहणी दौऱ्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केलीय. काँग्रेसनं इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी फडणवीस आमच्या सायकल रॅलीला नौटंकी म्हणाले होते. आता त्यांचाही हा पूरग्रस्त भागाचा दौरा नौटंकी आहे का? असा सवाल पटोले यांनी केलाय. त्याचबरोबर 4 दिवसांनी आपण पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. (Criticism of Nana Patole on Devendra Fadnavis’ visit to flood-hit areas)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ज्यांचा त्या भागाशी संबंध नाही त्यांनी दौरा करु नये. त्यांच्या दौऱ्यामुळे मदतकार्यात अडचणी येतात. यंत्रणांवर ताण येतो असं आवाहन केलं आहे. त्याबाबत विचारलं असता. दौरा प्रत्येकाने करावा. मात्र, पवार जर म्हणत असतील की दौऱ्याने यंत्रणांवर फरक पडतो तर तसं असेलही. पण दौरा करायचा कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दौऱ्यामुळे तिथली परिस्थिती समजते, असंही पटोले म्हणाले.

गुजरातला द्यायला पैसे, महाराष्ट्राला का नाही?

केंद्र सरकारकडे राज्याचे 1 लाख कोटी रुपये बाकी आहेत. त्यांनी ते अद्याप दिले नाहीत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढवत आहेत. डिझेलंही 100 रुपयांवर गेलं आहे. गुजरातला द्यायला पैसे आहेत. मग महाराष्ट्राला का देता येत नाहीत? असा प्रश्नही पटोले यांनी विचारला आहे. केंद्राने जी 700 कोटी रुपयांची मदत केली ती मागच्या वर्षीच्या अवकाळी पावसाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर पैसे द्यावे. आपत्ती व्यवस्थापन कायदा लक्षात ठेवावा, असंही पटोले यांनी यावेळी म्हटलंय.

मोरगिरीत दरडग्रस्तांसोबत फडणवीसांचं जेवण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी तीन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावऱ्यांची भेट घेतली. आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या गावातील नागरिकांसाठी गावातील शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोरगिरी गावातील शाळेत असणाऱ्या दरडग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आंबेघर दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांना या हायस्कूलमध्ये ठेवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांनी दरडग्रस्तांसोबत खाली बसून शाळेतच जेवण केलं. जे जेवण पूरग्रस्तांसाठी देण्यात येतं, त्यातीलच जेवण फडणवीस आणि दरेकर यांनी स्वत:ही खाल्लं.

संबंधित बातम्या :

Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 3 महत्वाचे मुद्दे उपस्थित, वाचा सविस्तर

Video : मी काय राज कुंद्रा आहे का?, राज ठाकरेंचा खोचक प्रश्न, उपस्थितांमध्ये हशा

Criticism of Nana Patole on Devendra Fadnavis’ visit to flood-hit areas

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.