Sanjay Raut: शरद पवार साहेबांना धमकी देण्या इतपत माज वाढलाय, संजय राऊतांनी राणेंच्या भाषेवर बोट ठेवलं, मोदी-शहांना थेट सवाल?

नारायण राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार संजय राऊत यांनी घेतला आहे. पवारांच्या वयाचा, त्यांच्या पदाचा मान ठेवता येत नसेल तर आपण मराठी म्हणून घ्यायला देखील नालायक आहोत असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut: शरद पवार साहेबांना धमकी देण्या इतपत माज वाढलाय, संजय राऊतांनी राणेंच्या भाषेवर बोट ठेवलं, मोदी-शहांना थेट सवाल?
संजय राऊत
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 10:24 AM

मुंबई: राज्यात सत्ता बदलाचे संकते मिळू लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. गुरुवारी नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.  शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही, असं धमकी देणारं कुणी राज्यात असेल तर त्याचा विचार हा मोदी शहांना करावा लागेल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पवारांच्या वयाचा, त्यांच्या पदाचा मान ठेवता येत नसेल तर आपण मराठी म्हणून घ्यायला देखील नालायक आहोत असेही राऊत यांनी म्हटले आहे. पवारांवर केलेल्या टीकेवरून संजय राऊत यांनी नारायन राणेंना जोरदार टोला लगावला आहे.

नाराणय राणे यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

भाजप नेते नारायण राणे यांनी दोन ट्विट केले होते. या दोन ट्विटमधून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. ”आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काही जणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही’. माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.” असे नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. या ट्विटचा आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

‘शिवसेनेचा आकडा कमी झाला’

दरम्यान यावेळी बोलताना शिवसेनेकडे असलेल्या आमदारांचा आकडा कमी झाल्याचे देखील संजय राऊत यांनी मान्य केले आहे. शिवसेनेकडे असलेल्या आमदारांचा आकडा कमी झाला आहे. लोकशाहीमध्ये बहुमत हे आकड्यांवर अवलंबून असते. मात्र हा आकड्यांचा खेळ फार चंचल असतो. ज्या दिवशी हे आमदार मुंबईत येतील, त्यादिवशी आमदारांच्या निष्ठेची बाळासाहेबांवर भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल. जेव्हा बहुमताचा विषय सभागृहात जाईल तेव्हाच सर्व चित्र स्पष्ट होईल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.