CWC Meeting : पक्षाच्या कार्यकारणीची आज बैठक, काँग्रेसची धुरा कोणाच्या हातात? काँग्रेस नेत्यांचं मत काय?

काँग्रेस पक्षाची CWC ची बैठक आज अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

CWC Meeting : पक्षाच्या कार्यकारणीची आज बैठक, काँग्रेसची धुरा कोणाच्या हातात? काँग्रेस नेत्यांचं मत काय?
Follow us
| Updated on: Aug 24, 2020 | 10:16 AM

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या त्यांच्या पदाचा राजीमाना देणार असल्याची माहिती आहे (CWC Meeting To Decide Who Is The New President Of INC). त्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाची मागणी जोर धरु लागली आहे. आज काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची (CWC) महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर काहींनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष पद सोपवण्यात यावं अशी मागणी केली आहे (CWC Meeting To Decide Who Is The New President Of INC).

काँग्रेस पक्षाची CWC ची बैठक आज अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. बैठकीत नवीन अध्यक्ष नियुक्तीवर चर्चा होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता पार पडणार आहे.

पक्षाच्या पुनर्रचनेबाबत नेत्यांचं सोनिया गांधींना पत्र

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील समावेश आहे.

काँग्रेसमध्ये अद्याप सोनिया गांधी यांच्या जागेवर कुणाला घेण्यात यावं याबाबत संभ्रम आहे. पत्रावर स्वाक्षरी केलेल्या काही नेत्यांच्या मते ते पत्रात लिहिलेल्या सर्व बाबींशी सहमत नाहीत. तरी, या पत्रातून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे, ज्यावर विचार व्हायला हवा. मात्र, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध दर्शवला आहे.

दिल्ली काँग्रेसकडून प्रस्तावास मंजुरी

दिल्ली प्रदेश काँग्रेसने रविवारी एक आपत्कालीन बैठक बोलावली. यामध्ये राहुल गांधी यांनी पक्षाचा अध्यक्ष बनवण्यासाठी एक प्रस्ताव मंजुर करण्यात आला. राहुल गांधींना कॉंग्रेसचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी डीपीसीसी अध्यक्ष अनिल कुमार यांनी केली.

पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल : सुनील केदार

“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मी मनापासून समर्थन करतो. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे लज्जास्पद आहे. त्यांनी त्यांच्या या कृत्याबद्दल तातडीने माफी मागितली पाहिजे. अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाहीत”, असं ट्विट राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी केलं.

तसेच “जर पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल. त्यामुळे सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे”, असेही सुनील केदार म्हणाले. सुनील केदार यांच्या ट्विटनंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आले आहेत (CWC Meeting To Decide Who Is The New President Of INC).

“कम बॅक राहुलजी”

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील पत्राच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “राहुलजींनी आता काँग्रेसचे नेतृत्व केले पाहिजे. त्यांच्या भावनांचा सन्मान करत, ‘कम बॅक राहुलजी’ असे आम्ही म्हणू इच्छितो. जोपर्यंत ते पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत नाहीत, तोपर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणून सोनियाजींनी काँग्रेसचे नेतृत्व केले पाहिजे”, असं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केलं.

“नेहरु-गांधी परिवाराशिवाय काँग्रेसची कल्पनाही करु शकत नाही”

काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले, “ही वेळ काँग्रेसने एक मत मिळवण्याची आहे. मत भिन्नतेची नाही. ज्या कुटुंबाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यानंतर देशासाठी जे त्याग आणि बलिदान केले ते सर्वश्रुत आहे. प्रसारमाध्यमांवर जे काही येत आहे, त्याच्याशी मी सहमत नाही. नेहरु गांधी परिवाराशिवाय मी काँग्रेसची कल्पनाही करु शकत नाही”.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लढण्यासाठी अध्यक्षपद राहुल गांधी यांना मिळावे”

आसामचे काँग्रेस अध्यक्ष रिपून बोरा यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राहुल गांधींना कॉंग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची विनंती केली. जेणेकरुन ते पक्षाचे नेतृत्व करु शकतील आणि भाजप आणि आरएसएसमोर लढा देऊ शकतील.

CWC च्या सदस्यांवर संजय निरुपम संतापले

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी CWC च्या सदस्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. “सोनियाजींनी राजीनामा का द्यावा? CWC चे सर्व सदस्य राजीमाना देऊन बाजूला ता होत नाहीत? 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधींनी राजीमाना दिला होता. मग काँग्रेसच्या कार्यकारीणीची काहीही जबाबदारी नाही का? CWC च्या सदस्यांनी आतापर्यंत राजीनामा का दिला नाही”, असं ट्विट करत संजय निरुपम यांनी आपला संताप व्यक्त केला.

“सोनिया गांधीना यावेळी पक्षाचं नेतृत्त्व केलं पाहिजे”

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटलं, “23 वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिल्याची बातमी अविश्वसनीय आहे आणि जर हे खरं आहे तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रसारमाध्यमांमध्ये जाण्याची गरज नव्हती. यावेळी सोनिया गांधींनी पक्षाचे नेतृत्त्व सांभाळावे, हे माझं ठाम मत आहे.” (CWC Meeting To Decide Who Is The New President Of INC)

सचिन पायलट काय म्हणाले?

सचिन पायलट यांनी देखील याबाबत ट्विट करत त्यांचं मत व्यक्त केलं. “श्रीमती गांधी आणि राहुलजी यांनी दाखवून दिलं आहे की लोकांसाठी आणि पक्षासाठी बलिदान करण्याचा काय अर्थ असतो. आता एकमत करण्याची आणि एकत्र येण्याची वेळ आहे. जेव्हा आपण एकत्र येऊ, तेव्हा आपलं भविष्य अधिक मजबूत होईल. बहुतेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना राहुलजी पक्षाचे नेतृत्व करताना हवे आहेत”.

अशोक गहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंह, संजय निरुपम आणि डीके शिवकुमार सारख्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मात्र सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाला योग्य म्हटलं आहे.

सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

CWC Meeting To Decide Who Is The New President Of INC

संबंधित बातम्या :

सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.