Video : Devendra Bhuyar : सायंकाळी 5 ला दादांना फोन केला, 8 ला भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची वेळ अजून मिळालेली नाही, देवेंद्र भुयारांची तक्रार कायम

निवडणूक संपली की, तोंडाकडं पाहिलं जात नाही. विशेष करून अपक्ष आमदारांचं हे दुर्दैव आहे. महाविकास आघाडीत फक्त निवडणुकीच्या वेळी स्थान राहते. त्यानंतर निधीच्या संदर्भात किंवा अडीअडचणींच्या संदर्भात अपक्ष आमदारांना काही स्थान राहत नाही, अशी भीती देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.

Video : Devendra Bhuyar : सायंकाळी 5 ला दादांना फोन केला, 8 ला भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची वेळ अजून मिळालेली नाही, देवेंद्र भुयारांची तक्रार कायम
देवेंद्र भुयारांची तक्रार कायमImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 9:43 AM

मुंबई : भविष्यात तुमच्यासोबत राहायचंय की, नाही याचा विचार करू, असा इशारा अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दिला आहे. आमच्या नावानं नारळ फोडणं चुकीचं (Wrong) आहे, असंसुद्धा भुयार म्हणाले. अविश्वास दाखविण्याचं कारण नाही, असंसुद्धा भुयार यांनी सांगितलं आहे. झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, हे विचार करण्यासारखं असल्याचंसुद्धा ते म्हणाले. देवेंद्र भुयार यांनी संजय राऊतांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी (CM) तुमचा संपर्क कसा होईल, यासाठी मी प्रयत्न करतो. काही लोकं दुरावा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात, असं संजय राऊत म्हणाल्याचं देवेंद्र भुयार यांनी सांगितलं. भुयार म्हणाले, सकाळी 5 ला मी दादांना फोन केला होता. लगेच आज 8 वाजता त्यांची भेट घेतली. सर्व कामे त्यांनी मार्गी लावली. ही दादांची कामाची पध्दत आहे. मी मुख्यमंत्र्याची वेळ मागितली तरी अजूनपर्यंत वेळ मिळाली नाही, अशी खंत देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.

पाहा व्हिडीओ

अजित पवारांना झालेला प्रकार सांगितला

अपक्षा आमदार देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडीला इशारा दिलेला आहे. तुमच्यासोबत भविष्यात राहायचं की, नाही याचासुद्धा विचार करू, असं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भुयार यांनी भेट घेतली. शासकीय निवासस्थानी जाऊन भुयार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांशी चर्चा करून समोरची दिशा ठरवू असंसुद्धा सांगितलं आहे. देवेंद्र भुयार म्हणाले, मी हे सगळं प्रकरण अजित पवारांना सांगितलं. पहिल्या पसंतीचं मत शिवसेनेचे संजय पवार यांना, दुसऱ्या क्रमांकाचं मत संजय राऊत यांनी आणि तिसऱ्या क्रमांकाचं मत प्रफुल्ल पटेल यांना दिलं. अशी तीन जणांना मतं दिलं. पक्षाच्या मुख्य प्रदोत यांना दाखवून हे सर्व केलं. त्यामुळं अविश्वास घेण्याचं काही कारण नाही. मतदान केल्यानंतरही नारळ आमच्याच नावानं फोडत असालं तर ते चुकीचं आहे. त्यामुळं आम्ही तुमच्यासोबत राहायचं की नाही, यासंदर्भात मी अजित पवारांशी चर्चा केली. कारण विधान परिषदेत असं पुन्हा होणार. परत तुम्ही आमच्यावर अविश्वास दाखविणार. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये होणार.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी कायम

संजय राऊत यांची देवेंद्र भुयार यांनी भेट घेतली. कारण संजय राऊत यांना गैरसमज झाला. त्यामुळं मी नाराज झालो. जाहीरपणे असं वक्तव्य करणं चुकीचं असं आम्ही म्हटलं. हे पवार यांनीसुद्धा मान्य केलंय. याचे राजकीय आणि सामाजिक परिणाम हे आमच्यावर होतात, असं भुयार म्हणाले. भाजपची निती मला व्यक्तीशः पटतं नाही. त्यामुळं मी यापुढं महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करणार. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. 20 तारखेपूर्वी सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात येणार आहे. त्याठिकाणी चर्चा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही सूचना देण्यात आली आहे. देवेंद्र भुयार म्हाणाले, निवडणूक आली म्हणजे ग्रँड हयात, ट्रयडंटला बोलावते. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावते. पण, नंतर विचारले जात नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.