भाजपच्या दहीहंडीनंतर जांबोरी मैदानाची दूरवस्था, चिखलात गाड्या रुतल्या! शिवसेनेचे सचिन अहिर, सुनील शिंदे आक्रमक

शुक्रवारी उत्सव पार पडल्यानंतर आज जांबोरी मैदानाची दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. मैदानात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलंय. तर मोठ्या गाड्यांच्या चाकामुळे मोठाले खड्डे मैदानात पडले आहेत. यावरुन आता शिवसेनेचे विधान परिषदेवरील आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय.

भाजपच्या दहीहंडीनंतर जांबोरी मैदानाची दूरवस्था, चिखलात गाड्या रुतल्या! शिवसेनेचे सचिन अहिर, सुनील शिंदे आक्रमक
दहीहंडी उत्सवानंतर जांबोरी मैदानाची दूरवस्थाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 6:47 PM

मुंबई : राज्यात शुक्रवारी सर्वत्र दहीहंडीचा उत्सव (Dahi Handi Festival) पाहायला मिळाला. मुंबईतही अनेक ठिकाणी विविध पक्षाच्या नेत्यांनी दहीहंडी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. त्यात भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव आयोजित केला. जांबोरी मैदानातील (Jambori Ground) आयोजित उत्सवाला विरोधकांकडून विरोध करण्यात आला होता. मात्र, तरीही या मैदानात भाजपनं दहीहंडीचं आयोजन केलं. शुक्रवारी उत्सव पार पडल्यानंतर आज जांबोरी मैदानाची दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. मैदानात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलंय. तर मोठ्या गाड्यांच्या चाकामुळे मोठाले खड्डे मैदानात पडले आहेत. यावरुन आता शिवसेनेचे विधान परिषदेवरील आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय.

दहीहंडी साजरी झाल्यानं मैदान उद्ध्वस्त- सुनील शिंदे

आमदार सुनील शिंदे म्हणाले की, जांबोरी मैदानाची जी दूरवस्था झालीय ती जनतेच्या भावना तीव्र करणारी आहेत. आम्हीही पत्र व्यवहार केला होता की आम्हाला परवानगी द्या. दहीहंडी साजरी झाल्यानं मैदान उद्ध्वस्त झालंय. आम्ही सोमवारी पालिकेला पत्र देणार आहोत. कल्पना होती की असं झाल्यानं इथं दूरवस्था झालीय. वेळ, पैसा वाया गेला आहे. पुन्हा मैदान दुरुस्त होईल की नाही माहिती नाही. खेळाडू आणि स्थानिकाचं नुकसान झालंय. काल कार्यक्रमाचं आयोजन केल्यानं उद्ध्वस्त मैदान उद्ध्वस्त झालंय. महापालिका येतेय म्हणून दहीहंडी करावी लागतेय, असा टोला सुनील शिंदे यांनी लगावलाय.

दहीहंडी हा राजकीय विषय नव्हता. आम्ही कधीही हा विषय राजकीय केला नाही. आम्ही पत्र देऊ आणि कारवाई करा अशी मागणी करु. वरळीकरांच्या सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्याची भरपाई कुठून होणार? असा सवालही सुनील शिंदे यांनी केलाय.

आयोजकांकडून भरपाई करुन घ्या – अहिर

आमदार सचिन अहिर यांनीही जांबोरी मैदानाच्या दूरवस्थेवरुन भाजपवर टीका केलीय. कोट्यवधी रुपये खर्च करुन जांबोरी मैदानाचं सुशोभिकरण केलं. स्थानिक नागरिकांचं म्हणणं होतं की इथे कार्यक्रम नको. जांबोरी मैदानाची दूरवस्था ज्यांनी केली त्यांच्याकडून भरपाई करुन घेतली पाहिजे, यासाठी आम्ही पालिकेला निवेदन देणार असल्याचं अहिर यांनी सांगितलं.

मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.