‘बाप तसा बेटा’, काल राज्यमंत्री भरणेंकडून अपघातग्रस्ताला मदत, आज मुलाची गाडी बनली अ‌ॅम्बुलन्स!

राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची संवेदनशील राजकारणी म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे.

'बाप तसा बेटा', काल राज्यमंत्री भरणेंकडून अपघातग्रस्ताला मदत, आज मुलाची गाडी बनली अ‌ॅम्बुलन्स!
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 6:26 PM

इंदापूर (पुणे) : राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची संवेदनशील राजकारणी म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांच्या अनेक कृत्यातून त्यांची माणुसकी, जनतेप्रति असलेलं प्रेम दिसून येतं. मदतीला धावून जाणं हा त्यांचा स्थायीभाव. गेल्या अनेक महिन्यांपासून अपघातग्रस्तांना मदत केल्याचे भरणेंचे फोटो वरचेवर व्हायरल होत आहेत. वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकत भरणेंचे पुत्र श्रीराज यांची आलिशान गाडी आज एका अपघातग्रस्तासाठी अ‌ॅम्बुलन्स बनली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुत्राने पुन्हा एकदा अपघातग्रस्ताला मदत केली असून रस्त्यावरती पडलेल्या अपघातग्रस्ताला आपल्या स्वतःच्या आलिशान गाडीत घेऊन श्रीराज भरणे यांनी त्यास तात्काळ उपचार मिळवून दिले.

श्रीराज भरणे हे आज खाजगी कामासाठी अकलूजला गेले होते. अकलुजहून इंदापूरला येत असताना सुरवड या गावी एका दुचाकीचा अपघात झालेला होता. दुचाकीस्वार हा रोडवरती पडलेला आहे, असं दिसताच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे यांनी तात्काळ आपली गाडी थांबवली. अपघातग्रस्ताला आपल्या गाडीत घेतले. यावेळी राज्यमंत्री भरणे यांचे विश्वासु अंबादास लांडगे यांनी ही मौलाची मदत केली. तसंच अपघातग्रस्ताला इंदापूर येथील एका खासगी दवाखान्यात आणले व त्याच्यावरती उपचार करण्याची विनंती डॉक्टरांना केली..

श्रीराज भरणे यांनी 19 डिसेंबरला ही अशाच पद्धतीने अपघातग्रस्ताला मदत केली होती. या संदर्भातील व्हिडीओ इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. काल (बुधवारी) देखील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दौंड तालुक्यातील रावणगाव नजीक येथे अपघातग्रस्ताला धीर दिला होता तसंच त्याच्या उपचाराची व्यवस्था केली होती. पिता-पुत्र हे नेहमीच अपघातग्रस्तांना मदत करीत त्यांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र इंदापूरसह महाराष्ट्राला दिसून येत आहे.

हे ही वाचा

Photo : राज्यमंत्री दत्ता भरणेंची माणूसकी, अपघातग्रस्ताला धीर देत उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.