साहेब-दादांच्या सभेला वडील नेहमी यायचे, मी मंत्री असताना मात्र हयात नाहीत, अजितदादांसमोर दत्ता भरणे भावूक

माझ्या घरात कोणताही राजकीय वारस नव्हता. पण मी आज मंत्री झालो. असं मंत्री दत्ता भरणे म्हणाले (Datta Bharne Ajit Pawar Indapur)

साहेब-दादांच्या सभेला वडील नेहमी यायचे, मी मंत्री असताना मात्र हयात नाहीत, अजितदादांसमोर दत्ता भरणे भावूक
दत्ता भरणे, अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 2:35 PM

इंदापूर : पवारसाहेब-अजितदादांच्या सभेला वडील नेहमी यायचे, मात्र मी मंत्री असताना वडील नाहीत, अशी खंत व्यक्त करतााना राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणे (Datta Bharne) भावूक झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इंदापूर दौऱ्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी अजित पवारांसमोरच दत्तामामांनी त्यांचं तोंडभर कौतुक केलं. (Datta Bharne gets emotional in memory of late father in presence of Ajit Pawar in Indapur)

“साहेब-दादांमुळे मंत्री”

“तुम्ही पाठबळ दिल्यामुळे आमदार झालो, साहेब, दादा, ताईंच्यामुळे मंत्री झालो. कोरोनाचं मोठं संकट असल्यामुळे गेलं वर्षभर एकही जाहीर कार्यक्रम झाला नाही. अनेक बॅंका कर्ज देतात, पण पुणे जिल्हा बॅंक हीच गोरगरीबांची बॅंक आहे. निवडणुकांपुरतं राजकारण ठेवलं पाहिजे. विकासाचं राजकारण व्हायला हवं. इंदापूरच्या नगरपरिषदेत सत्ता नसतानाही 33 कोटी निधी दिला. मागच्या पाच वर्षातही इंदापूरसाठी 1360 कोटी रुपये निधी आणला. निवडणुकीत हार जीत असते, मात्र सगळ्यांनी एकत्र येत गावाचा विकास साधा. कोव्हिडचं संकट असतानाही रस्त्यांसाठी 550 कोटी निधी दिला” असं दत्ता भरणे सांगत होते.

“आप्पा, तुम्ही फक्त निधी मोजा”

“इंदापूर आणि बारामतीची गोष्ट वेगळी आहे, असं म्हणत रमेश थोरात यांना उद्देशून दत्तात्रय भरणे यांनी चिमटे काढले. इंदापूरवर अजितदादांची कृपादृष्टी आहे. वेगवेगळ्या योजनांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. आप्पा, तुम्ही फक्त निधी मोजा. आता कोव्हिडच्या काळातला निधी सांगतोय. कोव्हिड जाऊ द्या, मग बघा किती निधी येतोय. दादा तुम्ही इतका निधी दिलाय की दिवसाला एक कार्यक्रम होईल.” असं भरणे म्हणाले.

“लोकांना खोटं लगेच पटतं. पण खरं पटवून द्यावं लागतं”

“मागच्या वर्षी शेतीच्या पाण्यावरुन विरोधकांनी टीका केली. त्यावेळी एकटाच विचार करुन रडायचो. 2019 च्या निवडणुकीनंतर ठरवलं की इंदापूरच्या पाण्यासाठी काहीतरी करायचंच. अजितदादांनी जयंत पाटील यांचाकडे नेऊन पाण्याचा विषय मार्गी लावून दिला. मागच्या सरकारच्या काळात घेतलेले चुकीचे निर्णय दादांनी रद्द केले. इंदापूर तालुक्यात मिळणारं पाणी मागच्या सरकारच्या काळात कमी झालं. पण अजितदादांनी, जयंत पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यामुळे इंदापूरला मुबलक पाणी मिळेल. लोकांना खोटं लगेच पटतं. पण खरं पटवून द्यावं लागतं. काही लोकं काम न करता सतत पेपरला झळकत असतात” असं म्हणत भाजपावासी नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर भरणेंनी नाव न घेता टीका केली. (Datta Bharne Ajit Pawar Indapur)

“तुम्ही फक्त निष्ठा ठेवा, स्वार्थासाठी इकडे तिकडे उड्या मारु नका”

“मला आता फक्त काम करायचंय. कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. निरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्रासाठी अजितदादांनी 28 कोटी मंजूर केले. अर्थसंकल्पात 102 कोटींची तरतूद करणार. मी नेहमी कमी बोलतो, पण आज जरा म्हटलं थोडं लोकांना सगळंच सांगावं. इंदापूरला अजितदादांनी नेहमीच झुकतं माप दिलं. माझ्या घरात कोणताही राजकीय वारस नव्हता. पण मी आज मंत्री झालो. तुम्ही फक्त निष्ठा ठेवा, स्वार्थासाठी इकडे तिकडे उड्या मारु नका. आयुष्यात काहीही नसतं, एकमेकांशी चांगलं वागा. माझे वडील आज हयात नाहीत. साहेब, दादांच्या सभेला वडील नेहमी असायचे. पण मी आज मंत्री झाल्यानंतर वडील नाहीत याचं दु:ख आहे” असं दत्ता भरणे म्हणाले.

संबंधित बातम्या : 

अजित पवार इंदापूर दौऱ्यावर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून 101 किलोंचा तिरंगा हार

भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..?, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला

(Datta Bharne gets emotional in memory of late father in presence of Ajit Pawar in Indapur)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.