दत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात

राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे.

दत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात
दत्तात्रय भरणेंची अपघातग्रस्ताला मदत
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 1:04 PM

पुणे: राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. दत्तात्रय भरणे काल त्यांचा विधानसभा मतदारसंघ इंदापूरच्या (Indapur) दौऱ्यावर होते. काल रात्री राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूरहून जात असताना त्यांच्या समोर इंदापूर बारामती (Indapur Barmati Road) रस्त्यावर एका दुचाकी स्वार आणि टेंपोचा अपघात झाला. अपघात झाल्याचं समजताच दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला. अपघातात जखमी झालेल्यांची चौकशी करून त्याला ताफ्यातील पोलिसांच्या गाडीत बसवून रुग्णालयात पाठवून दिलं.

दत्तात्रय भरणे यांच्याकडून माणुसकीचं दर्शन

इंदापूर बारामती रस्त्यावर अपघात झाल्याचं पाहून दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला. राज्यमंत्री भरणे, त्यांचा स्वीय सहायक आणि पोलीस अधिकारी यांनी अपघातग्रस्ताला मदत केली. अपघात ग्रस्ताला पोलिसांच्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. अपघातात जखमी झालेल्या युवकाला पोलिसांनी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. दत्तात्रय भरणे आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचं कौतुक होत आहे.

काही दिवसांपूर्वी अपघातग्रस्ताला दिलेला धीर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे नेहमीच अपघात ग्रस्तांना मदत करताना दिसून येतात. नोव्हेंबर महिन्यातही अपघात झाल्याचं दिसताच ताफा भरणे यांनी ताफा थांबवला होता. राज्यमंत्री भरणे यांनी त्यावेळी अपघातग्रस्ताची विचारपूस करत धीर दिला होता.महामार्गावर झालेला अपघात पाहताच भरणे यांनी घेतलेली तातडीने धाव अनेकांना माणुसकीचे दर्शन देणारी ठरली होती.

इंदापूर तालुक्यातील भिगवन येथील कार्यक्रमातून इंदापूरकडे परतत असताना पुणे- सोलापूर महामार्गावरती लोणी देवकर या ठिकाणी एका कारचा अपघात झाला होता. ती कार रस्ता सोडून समोरच्या दुभाजकावर गेली, यावेळी भरणे यांनी त्यांचा ताफा ताबडतोब थांबवून तातडीने जखमींकडे धाव घेतली होती. या अपघातग्रस्तांना धीर देत, त्याची विचारपूस करीत आपल्या गाडीतील पिण्याचे पाणी त्यांना दिले होते.

इतर बातम्या :

Nagaland: नागालँड पेटले, गोळीबारात 11 जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ, सुरक्षा दलाची वाहने पेटवली

Nashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल?

Dattatray Bharane help injured person in accident at Indapur Baramati Road

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.