दत्तात्रय होसबळे : व्यापर अनुभव, 6 भाषांचे जाणकार, आता RSS मध्ये दुसऱ्या क्रमांकावर
दत्तात्रय होसबळे यांची संघाचे नवे सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे. होसबळे हे भैयाजी जोशी यांची जागा घेणार आहेत. भैयाजी जोशी हे संघाच्या सरकार्यवाह पदावर जवळपास गेल्या 12 वर्षांपासून आहेत.
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. दत्तात्रय होसबळे यांची संघाचे नवे सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे. होसबळे हे भैयाजी जोशी यांची जागा घेणार आहेत. भैयाजी जोशी हे संघाच्या सरकार्यवाह पदावर जवळपास गेल्या 12 वर्षांपासून आहेत. होसबळे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत नवे सरकार्यवाह बनवण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठ्या बदलाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती.(Dattatraya Hosbale elected as the Sarkaryavah of Rashtriya Swayamsevak Sangh)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कुठल्याही निवडीबाबत अजून एकदाही निवडणूक झालेली नाही. दत्तात्रय होसबळे यांची निवडही बिनविरोध करण्यात आली आहे. दत्तात्रय होसबळे हे मुळचे कर्नाटकमधील सोरबा तालुक्यातील एका खेडेगावातील आहे. आहेत. ते संघाच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोडतात. होसबळे यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 मध्ये झाला होता. त्यांचं शिक्षण सागर इथे झालं आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी बंगळुरूमध्ये घेतलं आहे.
कोण आहेत दत्तात्रय होसबळे ?
>> दत्तात्रय होसबळे यांनी बंगळुरुतील प्रसिद्ध नॅशनल महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. पुढे त्यांनी साहित्य क्षेत्रातील शिक्षणासाठी म्हैसूर विद्यापीठात प्रवेश मिळवला. तिथे यांनी इंग्लिश लिट्रेचरमध्ये शिक्षण पूर्ण केलं.
>> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत प्रभावित झालेल्या होसबळे यांनी 1968 मध्ये संघात प्रवेश मिळवला. त्यानंतर 1972 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. 1978 मध्ये ते ABVPचे पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले. 15 वर्षे त्यांनी मुंबई हेडक्वार्टर इथं ABVPचे महासचिव राहिले आहेत.
>> विद्यार्थी दशेत असताना होसबळे यांना साहित्य क्षेत्रातील घडामोडींमध्ये मोठी आवड होती. वाय एन कृष्णमूर्ती आणि गोपाल कृष्ण अडिगा यांच्यासह कर्नाटकातील अनेक पत्रकार आणि लेखकांसोबत त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत.
>> इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या काळातील आणीबाणीमध्ये होसबळे यांनी एक वर्ष तुरुंगवास भोगला आहे. त्यांनी गुवाहाटी, आसाम, विश्व छात्र संघटना आणि युवा विकास केंद्राच्या स्थापनेत मोठी भूमिका बजावली आहे.
>> होसबळे हे कन्नड भाषेतील मासिक असीमाचे संस्थापक संपादक राहिले आहेत. 2004 मध्ये संघाच्या बौद्धिक विंगची कमान त्यांच्या हातात होती. होसबळे यांनी कन्नड, हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि संस्कृत भाषांचं ज्ञान आहे.
>> होसबळे हे फुटबॉलचे मोठे चाहते असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी फुटबॉल हा खेळ वैश्विक एकतेचं प्रतिक असल्याचं म्हटलंय. होसबळे हे अमेरिका आणि इंग्लंडमधील हिंदू स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक घडामोडींचे संरक्षक ही राहिले आहेत.
इतर बातम्या :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरकार्यवाहची निवड कशी होते?; वाचा सविस्तर
(Dattatraya Hosbale elected as the Sarkaryavah of Rashtriya Swayamsevak Sangh