विक्रमी मतांनी विजय मिळवत अंकिता पाटलांची राजकारणात एंट्री

हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेसाठी काल 23 जून रोजी मतदान झालं होतं आणि आज सकाळी मतमोजणी पार पडली.

विक्रमी मतांनी विजय मिळवत अंकिता पाटलांची राजकारणात एंट्री
Follow us
| Updated on: Jun 24, 2019 | 5:52 PM

बारामती : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत  17 हजार 274 मतांनी विजयी झाला. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेसाठी काल 23 जून रोजी मतदान झालं होतं आणि आज सकाळी मतमोजणी पार पडली. त्यामध्ये अंकिता पाटील या 17 हजार 274 विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या.

या विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी मित्रपक्ष आणि मतदारांचे आभार मानले. अंकिता पाटील यांना मिळलेलं मताधिक्य पाहता ते राज्यात विक्रमी ठरलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अंकिता पाटील या सध्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांचा सोशल मीडिया आणि शिक्षण संस्थांची जबाबदारी अंकिता पाटील यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्य होत्या. पण त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी अंकिता पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात

अंकिता यांच्या रुपाने पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. हर्धवर्धन पाटलांचे चुलते शंकरराव पाटील दोन वेळा बारामतीचे खासदार होते. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस वाढवण्यात त्यांनी मोठं योगदान दिलं. यानंतर हर्षवर्धन पाटील 1992 नंतर राजकारणात सक्रिय झाले. राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवलं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढलेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला.

व्हिडीओ पाहा :

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.