वडील 9 वेळा काँग्रेसचे खासदार, आता आमदार असलेली मुलगी शिवबंधन बांधणार?

निर्मला गावित या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांची कन्या आहेत. त्या लवकरच शिवबंधन बांधण्याचे संकेत आहेत.

वडील 9 वेळा काँग्रेसचे खासदार, आता आमदार असलेली मुलगी शिवबंधन बांधणार?
Follow us
| Updated on: Aug 17, 2019 | 4:22 PM

मुंबई : काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) शिवसेनेच्या (Shiv Sena) वाटेवर असल्याची चर्चा आहे. नुकतंच निर्मला गावित यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची नाशिकमधील इगतपुरीत इथं भेट घेतली. निर्मला गावित या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांची कन्या आहेत. त्या लवकरच शिवबंधन बांधण्याचे संकेत आहेत.

निर्मला गावित नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या काँग्रेस आमदार आहेत. माणिकराव गावित हे गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे आहेत. माणिकराव गावित हे सलग नऊवेळा नंदुरबारचे खासदार म्हणून संसदेत निवडून गेले. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिना गावित यांनी माणिकराव गावित यांचा पराभव करुन दहाव्यांदा लोकसभेत जाण्याचा त्यांचा विक्रम रोखला.

कोण आहेत निर्मला गावित?

  • निर्मला गावित या काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत
  • त्या नाशिकमधील इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात
  • 2009 आणि 2014 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला
  • 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता
  • 9 वेळा खासदार राहिलेले माणिकराव गावित यांच्या त्या कन्या आहेत.
  • निर्मला गावित यांनी काँग्रेसची विविध पदं भूषवली आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. राज्यभरातील विविध नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. कालच शिवसेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीकडून यंदा दिंडोरी लोकसभा निवडणूक लढवलेले धनराज महाले यांनी पुन्हा शिवबंधन बांधलं. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड, त्यांचा मुलगा आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.