मोठी बातमी: बारामतीत अजित पवार आणि शिवेंद्रराजेंची भेट; महिन्याभरातील तिसऱ्या भेटीने चर्चांना उधाण
अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवेंद्रराजे यांच्यात गेल्या महिनाभरात झालेली ही तिसरी भेट आहे. | Shivendra raje bhosale
बारामती: भाजपचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra raje bhosale ) यांनी रविवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवेंद्रराजे यांच्यात गेल्या महिनाभरात झालेली ही तिसरी भेट आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. (BJP MLA Shivendra raje bhosale meet Ajit Pawar in Baramati)
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये ही भेट पार पडली. अजित पवार आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले हे दोघेच एका कक्षात बसले होते. दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले बाहेर पडले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले. मतदारसंघातील कामानिमित्त अजितदादांना भेटायला आलो होतो. बाकी काहीही विषय नाही, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
शिवेंद्रराजे भोसले यांनी गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. साताऱ्यातील शरद पवार यांच्या पावसातील ऐतिहासिक सभेनंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पराभवाचा धक्का बसला होता. मात्र, शिवेंद्रराजे भोसले यांनी आपला मतदारसंघ राखण्यात यश मिळवले होते.
भाजपकडून पक्ष प्रवेशासाठी 100 कोटींची ऑफर होती- शशिकांत शिंदे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. तसेच तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपकडून 100 कोटी रुपये खर्च केले जातील, असेही मला सांगण्यात आले होते, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. मात्र, त्यावेळेस मी ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहीन, असेही शिंदे यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या:
कोण कितीही पावरफुल असो, सत्ता नसली की लोक विसरतात : शिवेंद्रराजे भोसले
काल शरद पवार म्हणाले, लवकरच सविस्तर बोलेन, आज अजित पवार म्हणतात सध्या काही बोलणार नाही
माझ्यात क्षमता, कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडेल : शिवेंद्रराजे भोसले
(BJP MLA Shivendra raje bhosale meet Ajit Pawar in Baramati)