Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांनी पेटारा उघडला, चॅलेंज फंडमधून अव्वल जिल्ह्याला 50 कोटी देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पेटारा उघडला आहे. नाशिक विभागातील जिल्ह्यांना भरघोस फंडांची रक्कम त्यांनी जाहीर केली आहे.

अजित पवारांनी पेटारा उघडला, चॅलेंज फंडमधून अव्वल जिल्ह्याला 50 कोटी देणार
Ajit Pawar
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 1:30 PM

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पेटारा उघडला आहे. नाशिक विभागाची वित्त आणि नियोजन विभागाची बैठक पार पडल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विभागातील जिल्ह्यांना भरघोस फंडांची रक्कम त्यांनी जाहीर केली आहे. (DCM Ajit pawar Distribute Fund To District)

“कोव्हिडच्या काळात राज्याची तिजोरी पाहिजे तेवढी भरभक्कम नाहीय मात्र तरीही निधीला काट न लावता भरघोस निधी नाशिक विभागातील जिह्यांना देत आहोत”, असं अजित पवार म्हणाले. Wकोव्हिड काळात राज्याचं उत्पन्न मंदावलं असलं तरीही जिल्ह्यांना देण्यात येणाऱ्या निधीला कात्री लावली नाही”, असं अजित पवार यांनी आवर्जून सागितलं.

कोणत्या जिल्ह्याला किती निधी

नंदुरबार जिल्ह्याला सर्वसाधारणमधून 130 कोटी (गेल्या वर्षी 115 दिले होते) जळगाव जिल्ह्याला 400 कोटी (गेल्या वर्षी 375 कोटी) नाशिक जिल्ह्याला 470 कोटी मंजूर

अजित पवार म्हणाले, “तुम्ही पाहिलं असेल तर कोणत्याही जिल्ह्याचा निधी कमी केला नाही. प्रत्येक जिल्ह्याचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. कोव्हिडचा काळ सुरु आहे. 8 ते 9 महिने लॉकडाऊन होतं. या काळात राज्याचं उत्पन्न मंदावलं होतं. परंतु अशाही परिस्थितीत जिल्ह्यांचा विकास रखडू नये म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यांना भरसोघ निधी दिला आहे. जिल्ह्याचा निधी नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी दिला जातो.

अव्वल जिल्ह्याला 50 कोटी रुपये

राज्य सरकारच्या स्पर्धेअंतर्गत तथा जिल्हा अंतर्गत चॅलेंज फंडच्या निमित्ताने विभागात अव्वल येणाऱ्या जिल्ह्याला प्रोत्साहानपर रक्कम म्हणून 50 कोटी रुपये राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

नाशिक नियो मेट्रो

नाशिक नियो मेट्रो साठी राज्य सरकार देखील तरतूद करणार आहे. नागपूर आणि नाशिक मेट्रो बाबतचा राज्य सरकार आपला भाग उचलणार असल्याचं अजित पवारांनी सांगितले. येत्या काळात पोलीस भरती, सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीला प्राधान्य दिलं जाईल, असंही अजित पवार म्हणाले.

शेतकरी आंदोलनाबाबत सरकारने दोन पावलं मागे यावं

अजित पवार यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना केंद्र सरकारनं दोन पावलं मागं यावं, असं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या पूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाले. तोच भावूकपणा शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल, असं अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा :

राज्यपाल न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, विधानपरिषेदच्या नियुक्त्यांवर अजित पवारांचा सूचक इशारा

नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, अजित पवारांनी ठणकावलं

NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन.
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?.
नाव न घेत अमोल मिटकरींचा ट्विट भिडे गुरुजींना खोचक टोला
नाव न घेत अमोल मिटकरींचा ट्विट भिडे गुरुजींना खोचक टोला.
त्यांची युती होईल तेव्हा बोलू; शिंदे-ठाकरेंच्या भेटीवर राऊतांचा टोला
त्यांची युती होईल तेव्हा बोलू; शिंदे-ठाकरेंच्या भेटीवर राऊतांचा टोला.
भाजपचं कमळाबाई असं बारस बाळासाहेब ठाकरेंनीच केलं - संजय राऊत
भाजपचं कमळाबाई असं बारस बाळासाहेब ठाकरेंनीच केलं - संजय राऊत.
दर्गावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचा दिवस निवडला; संजय राऊतांचा आरोप
दर्गावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचा दिवस निवडला; संजय राऊतांचा आरोप.
शिंदे - ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?
शिंदे - ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?.
नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचेही नुकसान
नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचेही नुकसान.
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....