पेट्रोल डिझेल भाववाढीवरुन अजित पवार भडकले, ‘पहिलं केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगा”

राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करावेत आणि इंधन भाववाढ नियंत्रणात आणावी, असं म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

पेट्रोल डिझेल भाववाढीवरुन अजित पवार भडकले, 'पहिलं केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगा
अजित पवार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास का घाबरत आहेत? आपलेच आमदार आपल्याविरोधात मतदान करतील, असे त्यांना वाटते का?
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 1:30 PM

पुणे :  राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करावेत आणि इंधन भाववाढ नियंत्रणात आणावी, असं म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. पहिलं केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगा, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं. (DCM Ajit Pawar reply Devendra fadanvis on petrol Diesel Price hike)

पेट्रोल डिझेलचे दर दररोज वाढतायेत. दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्यासारखी स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमती कमी असतानाही आपल्याकडे मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते…?

“सेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी. मागच्या काळात आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळीही पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता आणि पेट्रोल डिझेलचे दर 2 रुपयांनी कमी केले होते. आताच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी करावा आणि पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवावेत.”

अजित पवार काय म्हणाले…?

राज्याच्या करापेक्षा केंद्राचा कर जास्त आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगावे, अशा श्बात अजित पवार यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला. यावेळी अजित पवार चिडलेले पाहायला मिळाले.

शिवसेनेचं आज राज्यभर आंदोलन

वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेन आज राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये शिवसेना कार्यकर्ते- नेते-पदाधिकारी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात सेना कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

(DCM Ajit Pawar reply Devendra fadanvis on petrol Diesel Price hike)

हे ही वाचा :

राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी : देवेंद्र फडणवीस

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.