Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझा गाव : माझा बहिष्कार’, आठ गावांतील नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय गेली नऊ वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे बिरसी गावासह आठ गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. बिरसी गावातील महिला पुरुषांनी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्यासाठी 'माझा गाव, माझा बहिष्कार,' ही मोहीम हाती घेतली आहे.

'माझा गाव : माझा बहिष्कार', आठ गावांतील नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
eight villages to boycott Lok Sabha pollsImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 1:15 PM

गोंदिया | प्रतिनिधी, 20 मार्च 2024 : एकीकडे लोकसभा निवडणूकांचे बिगुल फुंकले गेले आहे. सगळ्या पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यातच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषयाचे भिजत घोंगडे कायम आहे. गेल्या नऊ वर्षांपासून नगर परिषद स्थापनेचा हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नागरिकांनीच हा विषय आता हातात घेऊन नगर परिषद संघर्ष समिती स्थापन केली आहे. नगर परिषद संघर्ष समितीच्या माध्यमाने निर्धार करून सरळ देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

बिरसी गावात महिलांच्या पुढाकाराने ‘माझा गाव, माझा बहिष्कार’, अशा घोषणा देत आठ गावातील नागरिकांनी सरकार विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. आमगाव नगर परिषद संघर्ष समितीच्या माध्यमातून नगर परिषद स्थापनेचे न्यायप्रविष्ठ प्रकरण राज्य सरकारने निकाली काढावे यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. यासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. तरीही राज्य सरकारने हे प्रकरण निकाली काढण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. लोकप्रतिनिधींनी देखील या प्रकरणात अनेकदा थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु राज्य सरकारने नगर परिषद स्थापनेचा विषय प्रलंबित ठेऊन आठ गावातील नागरीकांना मिळणाऱ्या योजना सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप होत आहे.

काय आहे प्रकरण

2014 पासून नगर पंचायत ते नगर परिषदचा विषय राज्य सरकारला योग्यपणे हाताळता आलेला नाही, त्यामुळे अद्यापही हा विषय सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे नागरीकांना घरकुल योजनांसह अनेक योजनेचा लाभ हा शून्य ठरला आहे. त्यामुळे नगर परिषद संघर्ष समितीने आता पुढाकार घेऊन हा विषयावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. नागरिक हितांसाठी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात नगर परिषद संघर्ष समितीच्या वतीने बिरसी गावात महिलांच्या पुढाकाराने ‘माझा गाव, माझा बहिष्कार’, अशा घोषणा देत लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याची ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. यापूर्वीच नगर परिषद संघर्ष समितीच्यावतीने तहसिलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय निवडणूक आयोगकडे याबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. परंतु प्रशासनाने याची काहीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे गाव पातळीवर नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. आज बिरसी गावातील महिला पुरुषांनी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सेन्सॉर बोर्डाची मानसिकता...'फुले' सिनेमावर आक्षेप, जयंत पाटलांचा टोला
सेन्सॉर बोर्डाची मानसिकता...'फुले' सिनेमावर आक्षेप, जयंत पाटलांचा टोला.
संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ न्यायालयात दाखवला
संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ न्यायालयात दाखवला.
'ऐपत नव्हती तर..', एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून वडेट्टीवारांचा संताप
'ऐपत नव्हती तर..', एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून वडेट्टीवारांचा संताप.
ताई - दादांमध्ये जुंपली; सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला
ताई - दादांमध्ये जुंपली; सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला.
MSRTC : '... अन्यथा आंदोलन करणार', एसटी कर्मचाऱ्यांना आक्रमक पवित्रा
MSRTC : '... अन्यथा आंदोलन करणार', एसटी कर्मचाऱ्यांना आक्रमक पवित्रा.
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर.
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना.
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.