कोल्हापूरच्या मटण दरापाठोपाठ पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला!

कोल्हापुरातील मटण दरापाठोपाठ पालकमंत्रिपदाचाही तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी (Satej Patil guardian minister of kolhapur) नियुक्ती झाली आहे.

कोल्हापूरच्या मटण दरापाठोपाठ पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला!
Follow us
| Updated on: Jan 15, 2020 | 6:00 PM

मुंबई : कोल्हापुरातील मटण दरापाठोपाठ पालकमंत्रिपदाचाही तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी (Satej Patil guardian minister of kolhapur) नियुक्ती झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर, पालकमंत्री कोण होणार याकडे कोल्हापूरकरांच्या (Satej Patil guardian minister of kolhapur) नजरा लागल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचं पालकमंत्रिपद (Satej Patil guardian minister of kolhapur) आपल्याला मिळावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या शर्यतीत बाजी मारली आहे. तर काँग्रेस नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे भंडाऱ्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या पालकमंत्र्यांची घोषणा झाली त्यावेळी बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी तर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांची अहमदनगरच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली. मात्र बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला पालकमंत्रिपदी न देता, काँग्रेसच्या अन्य मंत्र्याला पालकमंत्रिपद मिळावं अशी इच्छा व्यक्त केलं होतं.

थोरात यांनी पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आग्रही होते. सतेज पाटील मोठ्या मनाने सांगत असतील, तर पालकमंत्रिपद स्वीकारेन असं हसन मुश्रीफ म्हणाले होते.  मात्र बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचं पालकमंत्रिपद हे काँग्रेसच्या वाट्याचे आहे, राष्ट्रवादीला ते सोडणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे ठरलेल्या नियमाने कोल्हापूरचं पालकमंत्रिपद हे काँग्रेसला मिळालंच, शिवाय सतेज पाटील यांनी पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत बाजी मारली. हसन मुश्रीफ हे अहमदनगरचे पालकमंत्री म्हणून काम पाहतील.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.