शाह-फडणवीसांचं दिल्लीत ठरलं, युतीचा निर्णय मुंबईतच होणार!
नवी दिल्ली: युतीची चर्चा गेली खड्ड्यात म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युतीबाबत चर्चा सुरु झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली. या भेटीदरम्यान, महाराष्ट्रातील युतीबाबत शाह-फडणवीस यांच्यात चर्चा झाली. युतीचा निर्णय मुंबईत होईल, असं या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. […]
नवी दिल्ली: युतीची चर्चा गेली खड्ड्यात म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युतीबाबत चर्चा सुरु झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली. या भेटीदरम्यान, महाराष्ट्रातील युतीबाबत शाह-फडणवीस यांच्यात चर्चा झाली. युतीचा निर्णय मुंबईत होईल, असं या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरु असल्याचंही कळतंय.
मुख्यमंत्री फडणवीस हे मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता दिल्लीत दाखल झाले होते. त्यावेळी फडणवीस यांची दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत सकारात्मक चर्चा केली आणि धनगर आरक्षणाची मागणी केली. तर लोकसभा निवडणुकीचा अहवालही सादर केला.
युतीचा फॉर्म्युला ठरला
दरम्यान, युतीचा फॉर्म्युला ठरला असून केवळ चर्चेला बसणं आणि युतीची घोषणा करणंच बाकी आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यात सांगितलं. युतीसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत. फक्त निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे, अशी माहिती यावेळी दानवेंनी दिली.
युतीची चर्चा गेली खड्ड्यात
उद्धव ठाकरे दोन दिवसापूर्वी दुष्काळी बीड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी युती गेली खड्ड्यात माझ्या शेतकऱ्याचं बोला, नुसत्या घोषणा करत आहेत, तुमचे दिवस किती राहिलेत? घोषणांचा बुडबुडा आहे. कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी, असं म्हटलं होतं.
संबंधित बातम्या
युती गेली खड्ड्यात, उद्धव ठाकरेंचा बीडमध्ये हल्लाबोल
मुख्यमंत्री मध्यरात्री एक वाजता दिल्लीत, या तीन मुद्द्यांवर मोदींशी चर्चा