Deepak Kesarkar : लोकांना का भडकवताय?; दीपक केसरकरांचा पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Deepak Kesarkar : खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार कुणी दिला? खासदारांच्या घरावर मोर्चे काढायला लावता. लोकांना का भडकवता का?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता केला. आजारी असताना कटकारस्थान झाले नाही.

Deepak Kesarkar : लोकांना का भडकवताय?; दीपक केसरकरांचा पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला दीपक केसरकरांची हजेरी, शरद पवारांना सल्ला Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 5:03 PM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्याबद्दल आम्ही काहीच बोलणार नाही. त्यांच्यावर टीकाही करणार नाही, असं शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांकडून वारंवार सांगितलं जात होतं. मात्र, आता या आमदारांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तर थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. खासदारांच्या घरावर मोर्चे काढले जात आहेत. त्यांना जाब विचारले जात आहेत. लोकांना का भडकवताय? असा सवाल दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. केसरकर यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला. त्यामुळे दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला आहे.

मी तीन प्रश्न विचारले होते. त्यापैकी एकाचेही उत्तर दिलेले नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला नाही. केंद्राशी चांगले संबंध राहिले असते तर विकासाला चालना मिळाली असती. पण रोज सकाळी 9 वाजता उठायचे आणि केंद्रावर टीका करायची हेच धोरण राबवलं गेलं. त्यामुळे केंद्राशी संबंध चांगले राहिले नाही, अशी टीका करतानाच गेली अडीच वर्षे राजकारण सुरू होतं. दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबलं पाहिजे, असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

कालपर्यंत न फिरणारे आता फिरत आहेत

खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार कुणी दिला? खासदारांच्या घरावर मोर्चे काढायला लावता. लोकांना का भडकवता का?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता केला. आजारी असताना कटकारस्थान झाले नाही. आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली म्हणजे कटकारस्थान नाही. कालपर्यंत न फिरणारे आता फिरू लागलेत. सातव्या मजल्यावरील ऑफिसात कितीवेळा गेलात? व काय काम केलेत? बांधावर जा म्हणून सांगायचे, मग आता कार्यकर्त्यांना सांगून बांधावर जायला का सांगत नाहीत? असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांना नाव न घेता केला.

प्रवक्ते पुन्हा एकदा सुरू झाले

त्यांच्या प्रक्त्यांची भाषा मधल्या काळात सौम्य झाली होती. आता पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. लोकांना खोटं सांगून रडवत आहेत. कशासाठी हे? असा सवाल करतानाच आता जे युवासेना प्रमुख आहेत. ते शाखा शाखांमध्ये फिरताहेत. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण हे लोक आधी कुठे होते? असा सवाल त्यांनी केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.