‘मराठी तितुका मेळवावा’ला आदित्य ठाकरेंना आमंत्रण नाही, केसरकरांनी सामनाचा दाखला देत उत्तर दिलं, म्हणाले…

'मराठी तितुका मेळवावा' मराठी संमेलनाचं आजोयन करण्यात आलं आहे. यावरून सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. पाहा...

'मराठी तितुका मेळवावा'ला आदित्य ठाकरेंना आमंत्रण नाही, केसरकरांनी सामनाचा दाखला देत उत्तर दिलं, म्हणाले...
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 11:42 AM

मुंबई : ‘मराठी तितुका मेळवावा’ मराठी संमेलनाचं आजोयन करण्यात आलं आहे. याला आदित्य ठाकरेंना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. यावर मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी सामनाचा दाखल दिला आहे.

मला अद्याप या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालेलं नाही. तरीही मी माझ्या ऑफिसशी बोलतो. चेक करून सांगतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर दीपक केसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही सगळ्यांनाच या कार्यक्रमाचं निमंत्रित दिलं आहे. पण प्रत्येकाला वैयक्तिकरित्या निमंत्रण देणं शक्य होत नाही. पण उद्या सामनात जाहिरात छापून येणार आहे. त्यामुळे वेगळ्या निमंत्रणाची काय गरज आहे?, असं केसरकर म्हणालेत.

‘मराठी तितुका मेळवावा’ हे विश्व संमेलन घेण्या मागचं उद्देश्य हाच आहे की ज्यांनी मराठी भाषा आंतराष्ट्रीय पातळीवर टिकवली त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देता यावं. यामुळे मराठी भाषा आणि महाराष्ट्रात हित जोपासलं जाईल याची मला खात्री आहे, असं केसरकर म्हणालेत.

जगभरातून लोकं येत आहेत आणि हे लोकं मातृभूमीवर प्रेम करणारे आहेत. हा कौटुंबिक सोहळा आहे. मुंबईही महाराष्ट्राचं हृदय आहे आणि तिथेही मराठी टिकली पाहिजे हा आमचा उद्देश आहे. पुढच्या काळात सर्व शिक्षण मातृभाषेत होणार आहे, अशी माहितीही केसरकरांनी दिली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या एका वर्षात आम्ही ते मिळवू, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अनेक नवीन पुरावे मिळाले आहेत. त्यात हे सिद्ध होत आहे की मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे आणि तो अधिकार मराठी भाषेला मिळवून देणं आमचा अधिकार-कर्तव्य आहे आणि आम्ही ते मिळवू, असं केसरकर म्हणालेत.

अभिजात दर्जा मिळवणं ही वेगळी आणि टेक्नीकल बाब आहे. आम्हाला असे अनेक नवीन पुरावे मिळालेत. हे संम्मेलन घेण्याचा उद्देश आहे की ज्यांनी भाषा टीकवली त्यांना एकत्र आणणं, असंही ते म्हणालेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.