…त्यानंतर महाराष्ट्राला कळेलच खोके कोणी घेतले अन् विचारासाठी कोण लढतो, दीपक केसरकर यांचा ठाकरे गटाला इशारा
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते दीपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधाला आहे.
गिरीश गायकवाड,टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: बाळासाहेबांची शिवसेना (Shiv sena) गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधाला आहे. ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटाचा उल्लेख खोके सरकार आणि गद्दार असा केला जातो. या टीकेला दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोन दिवसांत मी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या महाराष्ट्राला कळेल चांगलं कोण आहे आणि वाईट कोणं आहे ते, खोके कोण घेतं आणि विचारासाठी कोण लढतं असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच धनुष्यबाण हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्हालाच मिळणार असा दावा देखील केसरकर यांनी केला आहे.
केसरकर यांनी नेमकं काय म्हटलं ?
दीपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. अनेक जण वाईट पद्धतीने टीका करतात पण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. मी दोनच दिवसांत पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या महाराष्ट्राल कळेल खोके कोणी घेतले आणि विचारासाठी कोण लढत आहे. वाईट कोण आणि चांगलं कोण असं केसरकर यांनी म्हटलं आहे.
शिंदे गट, ठाकरे गट पुन्हा आमने-सामने?
दरम्यान दसरा मेळाव्याप्रमाणेच दिवाळी पहाटच्या कार्यक्रमावरून देखील शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. यावर देखील दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक वेळी आमच्यावर आरोप करणं योग्य नाही. आम्ही तर फक्त बाळासाहेबांचे जे विचार आहेत, ज्या पंरंपरा आहेत त्या पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहोत, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.