Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलात तर धनुष्यबाणही तुमच्या कामाला येणार नाही, दीपक केसरकरांचा ठाकरेंना इशारा
आज हकालपट्टी करण्याचा सत्र सुरू आहे. बाळासाहेबांची विचारधारा हिंदुत्वाची होती त्यामुळे लोक जोडली गेली, असे केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई : बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना आता बंडखोर नेत्यांनीही खडोबोल सुनवायला सुरू केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी सकाळीच पाठीत खंजीर खुपसला म्हणत, दम असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन निवडून येऊन दाखवा असा इशारा दिला होता. त्याला आता शिंदे (Cm Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जो खरा शिवसैनिक आहे, त्याने बाळासाहेबांच्या प्रेमापोटी शिवसेना मोठी केली आहे. आज जी विधाने होत आहेत. याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. काँग्रेस-एनसीपी सोबत बाळासाहेबांनी कधी युती केली अस्ती का? शिंदे असोत भावना गवळी असोत यांना पक्षातून काढण्यात आले मग त्यांना बोलावणे पाठवले .आज हकालपट्टी करण्याचा सत्र सुरू आहे. बाळासाहेबांची विचारधारा हिंदुत्वाची होती त्यामुळे लोक जोडली गेली, असे केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
तुम्हाला लोक काय बोलतात हेही लक्षात घ्या
तसेच मागच्या निवडणुकीत शिवसेनेला नाही तर सेना भाजप युतीला मतदान झालं हे लक्षात घ्या, दुसऱ्यांना विश्र्वासघातकी म्हणता लोकं तुम्हाला काय बोलतात हे देखील ऐका, असेही ते म्हणाले आहेत. तर हे बेकायदेशीर सरकार आहे कोसळेल, असेही ठाकरे म्हणाले होते, त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय.
अशी वक्तवं करू नये
हे कोण ठरविणार . हे अध्यक्षांचे अधिकार आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण आहे, त्यावर बोलणे योग्य नाही. सुप्रीम कोर्टात असे प्रकरण असताना त्यावर प्रतिक्रिया करणे योग्य नाही सर्वांनी अशी वक्तव्य करू नये, असे वक्तव्य या साठी केले जात आहेत की आणखी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोडून जावू नयेत. आज ते लोकांना भेटायला लागलेत कार्यकर्त्यांना भेटायला लागलेत हे देखील आमच्यामुळे झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
विचार सोडले तर चिन्हाचाही उपयोग होणार नाही
तर धनुष्यबाण या चिन्हाबाबत काही निर्णय घेऊ नये असे पत्र शिवसेनेकडून निवडणुका आयोगाल पाठवले आहे, त्यावर ते म्हणाले, हे करणे स्वाभाविक आहे. तुम्ही करता ते योग्य आणि आम्ही करतो ते अयोग्य असं नाही. उशीर किती करायचा याला देखील मर्यादा आहेत. शिवसेनेची ओळख ही बाळासाहेबांचे विचार आहेत. आम्ही पण वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हांचा प्रचार केला. बाळासाहेबांचा विचारापासून दूर गेलात तर धनुष्यबाण देखील तुमच्या कामाला येणार नाही, अशा इशाराच त्यांनी देऊन टाकल आहे.