Deepak Kesarkar : शिवसेनेकडून टिकेचे बाण, केसरकरांकडून मात्र एकीसाठी प्रयत्न सुरुच

शिंदे सरकारची स्थापना होऊन महिना उलटला. या दरम्यानच्या काळात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वत्र दौरे केले आहेत. त्यामुळे एकमेकांवर तर टिका ही झालीच पण आरोप-प्रत्यारोपाची मालिकाही सुरुच होती. असे असतानाही शनिवारी पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही म्हणत एकत्र येण्याची हाक दिली आहे.

Deepak Kesarkar : शिवसेनेकडून टिकेचे बाण, केसरकरांकडून मात्र एकीसाठी प्रयत्न सुरुच
आ. दीपक केसरकर, शिंदे गटाचे प्रवक्तेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 10:02 PM

मुंबई :  (Shivsena) शिवसेना पक्षातून बंड, सत्तांतर आणि आता मंत्रिमंडळाचा विस्तार तोंडावर येत असतानाही शिंदे गटाचे प्रवक्ते (Deepak Kesarkar) दीपक केसरकर हे शिवसेना आणि शिंदे गट हे एकत्र यावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेकडून शिंदे गटातील (Rebel MLA) आमदारांवर टीकास्त्र हे सुरुच आहे. संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत गेल्यानंतर शिवसेनेकडून अरविंद सावंत, आदित्य ठाकरे हे शिंदे गटातील आमदरांवर टिका करीत आहेत.असे असले तरी शिवसेनेमध्ये पडणारी फूट ही महाराष्ट्राच्या हिताच्या नाही. मराठी माणसासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने एकत्र यावे, अद्यापही वेळ गेली नसल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. एकीकडे खालच्या पातळीवरील टिका, रोज शिवसेना पक्षातून आउटगोइंग होत असताना केसरकर यांचे हे वक्तव्य अनेकांच्या भूवया उंचवणारे आहे. त्यामुळे एवढे ताणले गेले असतानाही केसरकर मात्र, अद्यापही आशावादी आहेत.

अजूनही वेळ गेलेली नाही

शिंदे सरकारची स्थापना होऊन महिना उलटला. या दरम्यानच्या काळात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वत्र दौरे केले आहेत. त्यामुळे एकमेकांवर तर टिका ही झालीच पण आरोप-प्रत्यारोपाची मालिकाही सुरुच होती. असे असतानाही शनिवारी पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही म्हणत एकत्र येण्याची हाक दिली आहे. शिवाय स्वप्नात न राहता वास्तवाचा स्विकार करा असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे.

राणेंबाबत मोठा निर्णय

नारायण राणे आणि माझे संबंध हे जगजाहीर आहेत. असे असले तरी मतदार संघाच्या विकास कामासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची आपली तयारी असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे. मात्र, मी नारायण राणेंची तक्रार मोदींकडे केली यामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबाबतच्या सर्व बातम्या ह्या खोट्या आहेत. अशा अफवा पसरत असल्या तर मात्र, यानंतर मी माझ्या पत्रकार परिषदेत नारायण राणेच्या विषयावर बोलणे टाळणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही केलेली युती विश्वासघातकी कशी?

उद्धव ठाकरेंना भाजपा सोबत युती करायची होती तेव्हा त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले होते असे नाही. मात्र, आम्ही भाजपासोबत केलेल्या युतीनंतर आम्हाला विश्वासघातकी किंवा गद्दार का म्हणतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंना भाजपा सोबत युती करायची होती या विधानाने राज्यात खळबळ उडाली होती. मात्र, त्यावर आपण ठाम असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे. एवढेच नाहीतर खरं आहे की खोटं याचे याचा खुलासा करावा असे आव्हानही त्यांनी ठाकरे यांना दिले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.