एचएएल कराराचे पुरावे सार्वजनिक करत संरक्षण मंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांवर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी सीतारमन या पंतप्रधान मोदी यांचा बचाव करण्यासाठी संसदेत खोटं बोलल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी म्हणाले की, एचएएलला (हिंदूस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड) एक लाख कोटी रुपयांच्या खरेदीच्या आदेशावर खोटं बोलल्या गेलं. राहुल गांधींनी दावा केला होता की, […]
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांवर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी सीतारमन या पंतप्रधान मोदी यांचा बचाव करण्यासाठी संसदेत खोटं बोलल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी म्हणाले की, एचएएलला (हिंदूस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड) एक लाख कोटी रुपयांच्या खरेदीच्या आदेशावर खोटं बोलल्या गेलं. राहुल गांधींनी दावा केला होता की, एचएएलला एकही पैसा मिळालेला नाही. सीतारमन यांच्यावर आरोप करत राहुल गांधीनी पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते. यावर संरक्षण मंत्र्यांनी एचएएलशी झालेल्या कराराचे कागदपत्र आता सार्वजनिक केले आहेत.
राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘जेव्हा आपण एखादं खोटं बोलतो, तेव्हा आपल्याला पहिलं खोटं लपवण्यासाठी आणखी खोटं बोलावं लागतं. पंतप्रधानांच्या राफेल प्रकरणी बचाव करण्यासाठीच्या उत्सुकतेत संरक्षण मंत्री संसदेत खोटं बोलल्या. उद्या संरक्षण मंत्र्यांनी संसदेच्या कागदपत्रांआधी एचएएलला एक लाख कोटी देण्याचा सरकारी आदेश दाखवावा किंवा राजीनामा द्यावा.’
When you tell one lie, you need to keep spinning out more lies, to cover up the first one.
In her eagerness to defend the PM’s Rafale lie, the RM lied to Parliament.
Tomorrow, RM must place before Parliament documents showing 1 Lakh crore of Govt orders to HAL.
Or resign. pic.twitter.com/dYafyklH9o
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 6, 2019
सीतारमन यांनी याबाबत ट्वीट केले आणि हे सांगितले की, एचएएलसोबत कधी, कीती पैशांचा सुरक्षा करार करण्यात आला. सतारमन यांनी कागदपत्र सार्वजनिक करत दावा केला आहे की, 2014-18 या दरम्यान एचएएलने 26570.8 कोटी रुपयांच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तर 73 हजार कोटींचे करार पाईपलाईनमध्ये आहेत. हा दावा करत संरक्षणमंत्री सीतारमन यांनी राहुल गांधींना आव्हान केले की, आता राहुल गांधी संसदेत संपूर्ण देशासमोर माफी मागणार का आणि राजीनामा देणार का?
It’s a shame that the president of @INCIndia is spreading lies nd misleading the country.HAL has signed contracts worth 26570.8Cr (Between 2014 & 2018) nd contracts worth 73000Cr are in the pipeline.Will @RahulGandhi apologise to the country from the floor of the house nd resign? pic.twitter.com/PRWEMFUjml
— NSitharamanOffice (@nsitharamanoffc) January 6, 2019
Dear Shri @RahulGandhi , looks like you really need to start from ABCs.
Someone like you who is hellbent on misleading the public will quote an article even before reading it. https://t.co/D6osVZfDU9
— NSitharamanOffice (@nsitharamanoffc) January 6, 2019
काँग्रेसकडून सलग आरोप लावण्यात येत आहे की, वर्तमान सरकारने राफेल करार एएचएल ऐवजी अनिल अंबानीशी करुन त्यांचा फायदा केला. तर मोदी सरकारच्या मते, त्यांनी एएचएलला मजबूत करण्याचं काम केलं आहे. एएचएल सोबत सुरक्षा करार करण्यात येत असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी संसदेत सांगितलं. यावर राहुल गांधी यांनी एका वृत्ताच्या आधारे सांगितले होते की, एएचएल ही आर्थिक संकटात आहे. ती आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी कर्ज घेत आहे.
यावर काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट केले की, ‘खोटं बोलणाऱ्या संरक्षण मंत्र्यांचा पर्दाफाश झाला आहे. संरक्षण मंत्र्यांनी सांगितले होते की एएचएलशी एक हजार कोटी रुपयांच्या खरेदीचा करार करण्यात आला आहे. मात्र एएचएलने त्यांना एकही रुपया मिळाला नसल्याचं सांगितलं आहे.’
आता संरक्षण मंत्र्यांनी स्वत: एएचएल कराराचे कागदपत्र सार्वजनिक केल्याने या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. आता राहुल गांधी यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.