मोदी शपथ घेताना दिल्ली भाजपच्या वेबसाईटवर हॅकर्सकडून बीफ रेसिपी
नवी दिल्ली : सलग दुसऱ्यांदा केंद्रात बहुमताचे सरकार बनवणाऱ्या भाजपसाठी गुरुवारचा (30 मे) दिवस खूप मोठा आणि महत्त्वाचा होता. गुरुवारी एककीकडे मोदी आणि त्यांचे मंत्री शपथ घेत होते, तर दुसरीकडे भाजप-दिल्लीच्या वेबसाईटवर हॅकर्स बीफ पदार्थांचे फोटो टाकत होते. हॅकर्सने दिल्ली भाजपची www.delhi.bjp.org ही वेबसाईट हॅक करुन त्यावर बीफच्या फोटोंसह त्याची रेसिपी पोस्ट केली. होमपेजवर अनेक ठिकाणी […]
नवी दिल्ली : सलग दुसऱ्यांदा केंद्रात बहुमताचे सरकार बनवणाऱ्या भाजपसाठी गुरुवारचा (30 मे) दिवस खूप मोठा आणि महत्त्वाचा होता. गुरुवारी एककीकडे मोदी आणि त्यांचे मंत्री शपथ घेत होते, तर दुसरीकडे भाजप-दिल्लीच्या वेबसाईटवर हॅकर्स बीफ पदार्थांचे फोटो टाकत होते. हॅकर्सने दिल्ली भाजपची www.delhi.bjp.org ही वेबसाईट हॅक करुन त्यावर बीफच्या फोटोंसह त्याची रेसिपी पोस्ट केली. होमपेजवर अनेक ठिकाणी Beef लिहिण्यात आले होते.
हॅकर्स फक्त फोटोच टाकून थांबले नाही, तर त्यांनी भाजपच्या वेबसाईटवरील ‘about BJP’ च्या जागी ‘about beef’, ‘BJP history’ च्या जागी ‘beef history’ लिहिले. ‘leadership’ सेक्शनमध्ये देखील अनेक नेत्यांच्या जागी बीफच्या पदार्थांचे फोटो लावण्यात आले. मोदी आणि त्यांचे मंत्री राष्ट्रपती भवन परिसरात दुसऱ्यांदा शपथ घेत होते, नेमके त्याचवेळी हा सायबर हल्ला करण्यात आला. यातून हॅकर्सने भाजपच्या बीफ बंदीच्या निर्णयालाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. हॅक वेबसाईटवर ही हॅकिंग शॅडोव नावाच्या ग्रुपने केल्याचे म्हटले आहे.
पोलिसांकडे तक्रार नाही
दिल्ली भाजपचे माध्यम प्रमुख प्रत्युष कांत यांनी आपली टीम या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले. तसेच हे तांत्रिक दोषामुळे झाले की हॅकिंगमुळे झाले याची शहानिशा केली जाईल आणि जर हा हॅकिंगचा प्रकार असेल तर पोलिसांकडे तक्रार केली जाईल, असेही कांत यांनी नमूद केले.
दिल्ली पोलिसांनी याबाबत कोणतीही तक्रार आली नसल्याचे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी अनिल मित्तल म्हणाले, “आत्तापर्यंत आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.” दिल्ली भाजपची वेबसाईट जवळजवळ 2 तास हॅक झाली होती. त्यानंतर दुरुस्तीसाठी ही वेबसाईट बंद करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच भाजपची वेबसाईट पुन्हा व्यवस्थित सुरु झाली.
याच वर्षी मार्चमध्ये भाजपची मुख्य वेबसाईट www.bjp.org देखील हॅक करण्यात आली होती. त्यावेळी वेबसाईटचा डेटाबेस डिलीट करण्यात आला होता. त्यामुळे काही दिवस ही वेबसाईट बंद अवस्थेत होती.