महाराष्ट्रातून फौज, देशभरातील आजी-माजी 12 मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, शेकडो खासदार, तरीही भाजपची हार!

दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली होती. त्यासाठी महाराष्ट्रातून फौज मागवली होती. महाराष्ट्रातील भाजपचे 10 दिग्गज नेते दिल्ली विधानसभेच्या प्रचारात (Mah BJP Leaders in Delhi) उतरले होते.

महाराष्ट्रातून फौज, देशभरातील आजी-माजी 12 मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, शेकडो खासदार, तरीही भाजपची हार!
Follow us
| Updated on: Feb 11, 2020 | 1:59 PM

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेवर आम आदमी पक्षाने आपला झेंडा कायम ठेवला आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्ली काबीज केली. (Delhi Vidhansabhe Election Result)  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.  (Delhi Vidhansabhe Election Result)  काँग्रेसला इथे एकही जागा मिळवता आली नाही.

या निवडणुकीत भाजपने जोरदार ताकद लावली होती. 70 जागांसाठी भाजपचे देशभरातील शेकडो खासदार दिल्लीत तळ ठोकून होते. याशिवाय केंद्रीय मंत्र्यांचा ताफाही दिल्लीत कार्यरत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या अनेक सभा झाल्या. पण तरीही भाजपला दिल्लीची सत्ता खेचून आणण्यात यश आलं नाही.

महाराष्ट्राची फौज

दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली होती. त्यासाठी महाराष्ट्रातून फौज मागवली होती. महाराष्ट्रातील भाजपचे 10 दिग्गज नेते दिल्ली विधानसभेच्या प्रचारात (Mah BJP Leaders in Delhi) उतरले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, खासदार रक्षा खडसे, हीना गावित, पूनम महाजन, भारती पवार, आमदार आशिष शेलार या दिग्गज नेत्यांच्या दिल्लीत सभा झाल्या.

इतकी ताकद लावून भाजपला मोठी मजल मारता आली नाही. भाजपला 2015 मध्ये अवघ्या 3 जागा मिळाल्या होत्या, त्या आता 13 जागांवर पोहोचली आहे.

‘भाजपची प्रगती’

दरम्यान, या निकालाचं विश्लेषण करताना, भाजप आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि आपची अधोगती आणि भाजपची प्रगती असं म्हटलं. “आम्हाला मिळालेल्या जागा, समाधानकारक आहेत. मतांची टक्केवारी वाढली आहे. भाजपच्या जागा 3 वरुन 13 झाल्या, म्हणजे भाजपच्या कामगिरीत सुधारणा झाली”, असं शेलार म्हणाले. काँग्रेसचा सुपडासाफ झाला, आपची मतं घटली, भाजपची वाढ झाली, मतांची टक्केवारीही वाढली, असं शेलारांनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरोधात 65 जणांचा शड्डू, अरविंद केजरीवालांची संपत्ती…

दिल्ली जिंकण्यासाठी महाराष्ट्र भाजपची फौज, दहा नेते राजधानीत, पंकजा मुंडेंची दिल्लीत सभा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.