दिल्ली तो है हमारी, अब आई देश की बारी, ‘आप’चा नवा नारा
दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. (Delhi Vidhansabhe Election Result) अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. (Delhi Vidhansabhe Election Result)
दिल्लीतील विजयानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यालयात नवे पोस्टर्स झळकत आहेत. या पोस्टरवर राष्ट्रनिर्मितीसाठी आपला साथ द्या असा आशय लिहिला आहे. मिस्ड कॉल देऊन आपचे सदस्य व्हा अशी मोहीम आता आपनेही सुरु केली आहे.
भाजपच्या पावलावर पाऊल टाकत आपनेही हे कॅम्पेन सुरु केलं आहे. राष्ट्रनिर्मितीचा मुद्दा हाती घेऊन, ‘आप’ने नवा नारा दिला. त्याचीच झलक दिल्लीतील पोस्टर्सवरुन दिसत आहे. ‘राष्ट्र निर्माण के लिए AAP से जुड़े, जुड़ने के लिए मिस कॉल दें 9871010101.’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे.
देशभक्तीचे धडे
आम आदमी पक्षाच्या जाहीरनाम्यात हा मुद्दाही ठळकपणे मांडला होता. आपचं सरकार आल्यानंतर सरकारी शाळांमध्ये देशभक्तीचेही धडे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येतील, असं जाहीरनाम्यात म्हटलं होतं. त्यामुळे देशभक्तीचा मुद्दा लावून धरणाऱ्या भाजपला, आपने या मुद्द्यावरुनही घेरल्याचं दिसत आहे.