सर पे कफन बांधा है, जब तक जिंदा हूँ लढती रहूँगी… खोटेपणाचे आळ, स्वाती मालीवाल यांचं ट्विट चर्चेत..
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वामी मालीवाल यांना रस्त्यावर छेडछाड झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नवी दिल्लीः दिल्लीतील (Delhi) महिला आयोगानं केलेलं एक स्टिंग ऑपरेशन फक्त दिखावा असल्याचा दावा भाजपाने केला आहे. आम आदमी पार्टीच्या (Aam Admi Party) नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी खोटेपणाचा आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर दिलंय. माझ्याविषयी वाईट बोलणाऱ्यांना वाटतंय, मी घाबरेन. पण मीदेखील डोक्याला कफन बांधून खूप मोठी कामं केली आहेत. माझा आवाज कुणीही दाबू शकत नाहीत. जिवंत असेन तोपर्यंत लढत राहीन… असं ट्वीट स्वाती मालीवाल यांनी केलंय.
काय आहे नेमकं प्रकरण?
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वामी मालीवाल यांना रस्त्यावर छेडछाड झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्या कार ड्रायव्हरने छेडछाड केली, त्याने याआधीही अनेक महिलांना त्रास दिल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. स्वाती मालीवाल यांनी या कार ड्रायव्हरला पकडून दिलं. मात्र स्वाती मालीवाल यांचं स्टिंग पूर्णपणे बनावट असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
भाजपचा आरोप काय?
तर दिल्लीतील भाजप नेते मनोज तिवारी यांनी स्वाती मालीवाल यांचं स्टिंग खोटारडं आणि केवळ दिखावा असल्याचा आरोप केलाय.
स्वाती यांनी स्टिंगसाठी टाकलेला व्हिडिओ अत्यंत नाटकी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. व्हिडिओत स्वाती या कारच्या दोन्ही बाजूंनी ड्रायव्हरशी बोलताना दिसतायत तसेच स्वाती यांनीच ड्रायव्हरच्या खिडकीतून हात घातल्याचं दिसतंय, असा आरोप मनोज तिवारी यांनी केलाय…
विशेष म्हणजे आरोपी कार ड्रायव्हर हा आपचे आमदार प्रकाश जरवाल यांचा निकटचा मित्र असल्याचाही दावा मनोज तिवारी यांनी केलाय. त्यांनी यासंबंधीचा एक फोटोही शेअर केलाय. तसेच दोघांचेही कॉल रेकॉर्डिंग काढले तर सत्य समोर येईल, असा दावा मनोज तिवारी यांनी केलाय.
जिनहें लगता है मेरे बारे में झूठी गंदी बातें कर मुझे डरा देंगे उनको बता दूँ। मैंने सर पे कफ़न बांध इस छोटी सी ज़िंदगी में बहुत बड़े काम किए है। मुझपे कई अटैक हुए पर मैं रुकी नही। हर अत्याचार से मेरे अंदर की आग और बढ़ी। मेरी आवाज़ कोई नही दबा सकता। जब तक ज़िंदा हूँ लड़ती रहूँगी!
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 20, 2023
स्वाती मालीवाल यांचं ट्विट चर्चेत…
भाजप नेते मनोज तिवारी यांच्या आरोपानंतर स्वाती मालीवाल यांनी ट्विट केलंय. त्यांनी लिहिलंय… जिनहें लगता है मेरे बारे में झूठी गंदी बातें कर मुझे डरा देंगे उनको बता दूँ। मैंने सर पे कफ़न बांध इस छोटी सी ज़िंदगी में बहुत बड़े काम किए है। मुझपे कई अटैक हुए पर मैं रुकी नही। हर अत्याचार से मेरे अंदर की आग और बढ़ी। मेरी आवाज़ कोई नही दबा सकता। जब तक ज़िंदा हूँ लड़ती रहूँगी!