Deputy CM Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत:च कारचं सारथ्य करतात तेव्हा…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती पॅटर्न राबवल्यानंतर आता स्वत: कारचा ताबा घेत बारामतीची पाहणी केली.

Deputy CM Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत:च कारचं सारथ्य करतात तेव्हा...
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 12:07 AM

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Drive The Car) यांनी बारामती पॅटर्न राबवल्यानंतर आता स्वत: कारचा ताबा घेत बारामतीची पाहणी केली. यावेळी शहरात मास्क, हँडग्लोव्हजच्या वापरासह सातत्याने सॅनिटायझेशन करणे, शारिरीक अंतर राखणे अशा अनेक कार्यक्रमांची त्यांनी (Ajit Pawar Drive The Car) पाहणी केली.

बारामतीत विकासकामांची पाहणी करताना अजित पवारांनी त्यांच्या कारचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतलं. त्यांनी त्यांची टोयाटो लँड क्रुझर स्वत: चालवत अधिकाऱ्यांकडून बारामतीबाबत माहिती घेतली. यावेळी अजित पवारांनी सोशल डिस्टिंगचं काटेकोरपणे पालन केलं. त्यांनी त्यांच्या गाडीत कुणालाही बसण्याची परवानगी दिली नाही (Ajit Pawar Drive The Car).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याच्या उद्देशाने त्यांनी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं. तसेच, राँग साईडवरुन येणाऱ्यांना देखील अजित पवारांनी खडसावले. शिवाय, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असा सल्लाही दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गाडीसोबत कुठलाही बंदोबस्त घेतला नव्हता. त्यामुळे अजितदादा गाडीतून उतरताच परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवार यांनी स्वत: शहरात कार चालवत विकासकामांची प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी केली. दादांचे हे रुप अनेक वर्षानंतर बारामतीकरांना पहायला मिळाले (Ajit Pawar Drive The Car).

संबंधित बातम्या :

आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील : हसन मुश्रीफ

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर, पिता-पुत्राप्रमाणे : संजय राऊत

गरिबांसाठी 50 हजार कोटींचं पॅकेज द्या, फडणवीसांची मागणी, 1 लाख 60 हजार कोटीचं गणित मांडलं

Mera Angan Mera Ranangan | भाजपच्या आंदोलनाबाबत अखेर एकनाथ खडसेंची भूमिका जाहीर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.