‘तुम कुस्ती करो, हम कपडे संभालते हैं!’ असलं काही करु नका, अजितदादांचा मोलाचा सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि तरुण कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिलाय. तर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर चांगलंच तोंडसूख घेतलं.

'तुम कुस्ती करो, हम कपडे संभालते हैं!' असलं काही करु नका, अजितदादांचा मोलाचा सल्ला
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 4:06 PM

इंदापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिलाय. तर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर चांगलंच तोंडसूख घेतलं. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा अजितदादा यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आणि आपल्या कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्लाही दिलाय.( Deputy CM Ajit Pawar’s valuable advice to youth)

“काहीजण तिकडं पळाली. त्यांचा पायगुण असा की त्यांची सत्ताच गेली आणि आमची सत्ता आली. आता असली जित्राबं नकोच आपल्याला. ह्यांनी कितीही होय म्हणूद्या. मी नाहीच घ्यायचं म्हणतो. फक्त मला कुस्ती करायला लावून तुम्ही कपडे सांभाळू नका. नाहीतर तुम्ही ‘तुम कुसश्ती करो, हम कपडे संभाळते हैं!’ असं नाही झालं पाहिजे” म्हणज अजित पवार यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून गेलेल्या नेत्यांना इशाराच देऊ केलाय.

तरुण कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला

“आता आपल्याला नवी टीम तयार करायची आहे. मला पण 30 वर्षे राजकारणात झाली. त्यावेळी माध्यासोबत तरुणांची टीम होती. आताही आपण तरुणांची टीम तयार करु. तुम्ही काही काळजी करु नका. फक्त निर्व्यसनी राहा.चांगली कामं करा. ह्या बोटाचा थुका त्या बोटाला लावू ना. टोप्या फिरवू नका. दिलेला शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा. पवारसाहेबांशी एकनिष्ठ राहा. आपण फार चांगल्या पद्धतीनं काम करु”, अशा शब्दात अजित पवार यांनी तरुण कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिलाय.

हर्षवर्धन पाटील यांना टोला

अजित पवारांनी यावेळी बोलताना भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..? असा टोला हर्षवर्धन पाटील यांचं नाव न घेता लगावला. तर इंदापूरचा दूध संघ कधीच बंद पडला. तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही. बँक चालवता येत नाही. काय चाललंय, असा सवाल अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना केला.

तुमच्या दत्तामामाला मंत्री केलं

अजित पावर यांनी तुमच्या दत्तात्रय भरणेंना मंत्री केल्याचं इंदापूरवासियांना सांगितलं. सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे. रस्त्याची सगळी कामे पठ्ठ्याकडेच, अशोकराव चव्हाणही त्यांना मदत करतात. सामान्य प्रशासन विभाग जे खातं मुख्यमंत्री ठेवतात त्याचं राज्यमंत्रीपद दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिलं आहे. मामा मंत्री म्हणून नवखा आहे.पण, पाठपुरावा करायला चिकट आहे, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

Ajit Pawar | अजितदादा व्यासपीठावर, कार्यकर्त्याची घोषणाबाजी, दादा का म्हणाले, तुझी ग्रामपंचायत आली का?

अजित पवार इंदापूर दौऱ्यावर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून 101 किलोंचा तिरंगा हार

भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..?, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.