ना शिवेंद्रराजेंच्या भेटीत काळंबेरं, ना जलयुक्त शिवारच्या चौकशीत : अजित पवार

पुण्यातील पूरस्थितीला महापालिका जबाबदार, असा आरोपही अजित पवारांनी केला.(Ajit Pawar Comment after BJP MLA Shivendra Raje Bhosale Meet)

ना शिवेंद्रराजेंच्या भेटीत काळंबेरं, ना जलयुक्त शिवारच्या चौकशीत : अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 11:42 PM

पुणे : “सातऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रराजे विकास कामासाठी आले होते. त्यात काहीही काळबेरं नाही,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सातऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी अजित पवारांची पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेतली होती. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Ajit Pawar Comment after BJP MLA Shivendra Raje Bhosale Meet)

“शिवेंद्रराजे हे विकास कामासाठी भेटून गेले. या अशा भेटी होत राहतात. त्यामुळे असा काही अर्थ काढू नका. त्यात काहीही काळबेरं नाही,” असे अजित पवार म्हणाले.

“हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 10 ऑक्टोबरपासून 17 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीप्रमाणे मुसळधार पावसाची शक्यता होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. त्याशिवाय पुढील दोन दिवस अशाचप्रकारे पाऊस पडू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर NDRF च्या बोटी किंवा मदत कार्य पोहोचवणं हे काम सुरु आहे. विभागीय कार्यालयात मी सकाळपासूनच आढावा घेत आहे. खासदार सुप्रिया सुळेंनीही पाहणी केली आहे,” असेही अजित पवारांनी सांगितले.

“अनेक ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे. अनेक नैसर्गिक प्रवाह नाले, ओढे हे पाऊस पडल्यानंतर पाणी वाहून नेतात. मात्र ते सध्या अडवलेले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. काही ठिकाणी कित्येक मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे नदीत पाण्याची क्षमता वाढली. त्यानंतर स्थलांतरासह राहणे, खाण्याची सोय करण्यात आली,” असेही अजित पवार म्हणाले

“पावसाबाबत महापालिकेने काम करायला हवं होतं. आता त्याची बैठक घेतो आहे. भिंत का बांधली नाही? काम का झालं नाही? याबाबत बैठक घेत आहे. शहर कुठलही असो काम झालं पाहिजे. पुण्यातील पूरस्थितीला महापालिका जबाबदार, असा आरोपही अजित पवारांनी केला.”

“केंद्राने मदत केली पाहिजे”

“आम्ही पंचनामे करत आहोत. त्याला केंद्राचे काही नियम आहेत. त्यामुळे यात बाधित लोकांना मदत आधार राज्य सरकार देईलच. पण केंद्रानेही मदत केली पाहिजे. साखर कारखाने दहा दिवस लेट सुरू होत आहेत. अतिवृष्टीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठराविक निकषापेक्षा जास्त मदत द्यावी लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार आहे,” असेही अजित पवारांनी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेतील चौकशी सूडबुद्धीने नाही

जलयुक्त शिवार योजनेतील चौकशी ही कॅग अहवालानुसार सुरु आहे. त्याच्याच काळात हा अहवाल आला होता. त्याचेच जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हेच त्यावेळी मंत्री होते. जलयुक्त शिवार योजनेतील चौकशी सूडबुद्धीने लावलेली नाही, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल विचारले असता, त्याबद्दल मला माहिती नाही, असं मत अजित पवार यांनी मांडलं.  (Ajit Pawar Comment after BJP MLA Shivendra Raje Bhosale Meet)

संबंधित बातम्या : 

भाजप आमदार शिवेंद्रराजे अजित पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

‘नाथाभाऊ…लवकर राष्ट्रवादीत या’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकनाथ खडसेंना विनंती

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.