मानवतला जाण्यासाठी उपमुख्यमंत्री सीएसएमटी स्थानकावर, प्रवाशांची अजित दादांकडून विचारपूस
उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी विविध कामांचा झपाटा सुरु केला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांना भेटण्यासाठी मंत्रालयातही विविध भागातील नागरिक गर्दी करत आहेत.
मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी विविध कामांचा झपाटा सुरु केला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांना भेटण्यासाठी मंत्रालयातही विविध भागातील नागरिक गर्दी करत आहेत (Ajit Pawar). इतकंच काय तर अजित पवार हे छत्रपती शिवाजीमहाराज स्थानकावर आल्यानंतर तेथेही अक्षरशः त्यांना प्रवाशांनी गराडा घातला. उपमुख्यमंत्री आज मुंबईहून देवगिरी एक्सप्रेसने मानवतला जात आहेत, त्यासाठी ते छत्रपती शिवाजीमहाराज स्थानकावर पोहोचले (Ajit Pawar At CSMT). अजित पवारांना पाहून उपस्थित प्रवाशांनी त्यांच्या आजूबाजूला गर्दी केली. यावेळी अजित पवार यांनीही या प्रवाशांशी संवाद साधत त्यांची आपुलकीनं चौकशी केली.
प्रशासनावर वचक, झटपट निर्णय, स्पष्टवक्तेपणा अशा विविध बाबींमुळे अजित पवार हे बेधडक नेते म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अजित पवार यांनी कामांचा झपाटा सुरु केला. विशेष म्हणजे अजित पवार यांना भेटण्यासाठी राज्याच्या विविध भागातील नागरिक मंत्रालयात गर्दी करत आहेत. समोर आलेलं काम तत्परतेनं मार्गी लावण्यावर अजितदादांचा भर असतो. त्यामुळे साहजिकच आपले प्रश्न अजित पवारच मार्गी लावू शकतात, अशी आशा नागरिकांना आहे. अशातच अजित पवार यांना रेल्वे स्थानकावरही प्रवाशांनी गराडा घातला. विशेष म्हणजे अजितदादांनीही या प्रवाशांशी संवाद साधला, त्यांची चौकशी केली आणि समस्या जाणून घेतल्या.
अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (25 जानेवारी) बीड जिल्ह्यातल्या माजलगाव येथे विविध कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे आज अजित पवार हे मुंबईहून देवगिरी एक्सप्रेसने मानवतकडे निघाले आहेत. त्यासाठी ते मुंबईच्या छत्रपती शिवाजीमहाराज रेल्वे स्थानकावर पोहोचले.