Uddhav Thackeray Birthday | मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांकडून रात्री 12 वाजता अनोख्या शुभेच्छा

अजितदादांनी रात्री ठीक बारा वाजता फोटो शेअर करुन मुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन केले.

Uddhav Thackeray Birthday | मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांकडून रात्री 12 वाजता अनोख्या शुभेच्छा
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 11:06 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (27 जुलै) वाढदिवस. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वयाची साठी पूर्ण केली. (Deputy CM Ajit Pawar wishes CM Uddhav Thackeray on his 60th birthday)

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे.” अशा शुभेच्छा अजित पवार यांनी दिल्या आहेत.

(Deputy CM Ajit Pawar wishes CM Uddhav Thackeray on his 60th birthday)

अजितदादांनी रात्री ठीक बारा वाजता फोटो शेअर करुन मुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन केले. या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी फोटो शेअर केला आहे, दोघंही जण एकाच गाडीत बसले असतानाचा. महाराष्ट्राचे स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती असले, तरी फोटोत मात्र गाडीचे स्टिअरिंग अजित पवारांच्या हाती दिसत आहे.

हा फोटो बारामतीत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारचं स्टेअरींग अजितदादांच्या हाती असल्याचं सांगितलं होतं. मात्र कालच ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीनचाकी रिक्षाचे स्टेअरिंग आपल्या हातात असल्याचे वक्तव्य केले होते.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, अजित पवार यांनी 22 जुलै रोजी आपला 61 वा वाढदिवस साजरा केला. अजित पवारांकडे बघून ते 61 वर्षांचे आहेत असं कोणाला पटणारही नाही.

हेही वाचा : मोकळं-ढाकळं व्यक्तिमत्व, रांगडा गडी, न पटणारं वय, फ्रायरब्रँड अजित पवारांचा धगधगता प्रवास

(Deputy CM Ajit Pawar wishes CM Uddhav Thackeray on his 60th birthday)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.