“…तर मी राजीनामा देईन आणि निवृत्त होईन”, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देऊ इच्छित आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस त्यांना थांबवत आहेत", असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यांच्या या आरोपावर आता देवेंद्र फडणवीसांनी मोठे विधान केले आहे.

...तर मी राजीनामा देईन आणि निवृत्त होईन, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 4:16 PM

Devendra Fadnavis Big statement On Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अनेक मराठा आंदोलनकर्ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केले आहे. “एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यासाठी थांबवत आहेत”, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. आता यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आंदोलन केले आहे. बहुतांश वेळा मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठीही बसले आहे. त्यातच जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा टीका करताना दिसतात. आता मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देऊ इच्छित आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस त्यांना थांबवत आहेत’, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यांच्या या आरोपावर आता देवेंद्र फडणवीसांनी मोठे विधान केले आहे. मी आरक्षणात अडथळा आणला असं जर एकनाथ शिंदे म्हणाले, तर मी त्याचवेळी राजीनामा देईन, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

“राजकारणातून संन्यासही घेईन”

देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले. माझ्यानंतर एकनाथ शिंदेंनी केले आणि शिंदेंच्या पाठीशी मी भक्कमपण उभा राहिलो आहे. त्यामुळे अशाप्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा सांगतो जर एकनाथ शिंदेंनी सांगितलं की मराठा आरक्षणासाठी त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे, मी तो निर्णय होऊ दिला नाही, त्याचक्षणी मी राजीनामा देईन. तसेच राजकारणातून संन्यासही घेईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“…आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”

मला कल्पना आहे की, मनोज जरांगे यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. मात्र हे देखील सांगितलं पाहिजे की राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. मी त्याही पुढे जाऊन सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आहोत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न मी थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.